No Caste Certificate |'जात नाही, धर्म नाही' प्रमाणपत्रासाठी करावा लागेल धर्मत्याग! जाणून घ्या हायकोर्टाने असा आदेश का दिला?

Madras High Court on No Caste Certificate | तहसीलदारांचा आदेश रद्द करण्यास नकार देत याचिका फेटाळली
Madras High Court on No Caste Certificate
प्रतिकात्‍मक छायाचित्र.Pudhari Photo.
Published on
Updated on
Summary
  • जात किंवा धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मिळण्याची याचिकाकर्त्याची मागणी

  • न्यायमूर्तींनी दिला संविधानाच्या अनुच्छेद २५ चा हवाला

  • धर्मत्यागाच्या पुराव्यासह नवीन अर्ज करण्याचे दिले निर्देश

Madras High Court on No Caste Certificate

मदुराई : 'जात नाही, धर्म नाही' (No Caste, No Religion) प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आधी औपचारिकपणे आपल्या धर्माचा त्याग करावा लागेल, असे स्पष्ट करत तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मागणारी याचिका फेटाळली.

'जात नाही, धर्म नाही' प्रमाणपत्राची मागणी

आई-वडील हिंदू धर्माचे असले तरी, जात किंवा धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती रामास्वामी यांच्या एकलपीठासमोर यावर सुनावणी झाली.

Madras High Court on No Caste Certificate
High Court Ruling | "पोटगी नाकारणे आणि पत्नीचा त्याग करणे हे 'मानसिक क्रौर्यच' : हायकोर्ट

न्यायालयाने दिला संविधानाच्या अनुच्छेद २५ चा हवाला

न्यायमूर्ती रामास्वामी यांनी यावेळी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ चा हवाला देत, या अंतर्गत असलेल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्यामध्ये धर्म स्वीकारण्यासोबतच धर्मत्याग करण्याचा अधिकारही समाविष्ट असल्याचे नमूद केले. मात्र, प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी हा त्याग स्पष्टपणे नोंदवणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.

Madras High Court on No Caste Certificate
High Court : 24 महिन्यांत संपादन न केल्यास जमिनीचे आरक्षण आपोआप रद्द

धर्म त्यागाशिवाय प्रमाणपत्र जारी करण्याच्या विनंतीवर विचार नाही

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, त्याने आपला धर्म त्यागला आहे का? याचिकाकर्त्याने याने नाही, असे उत्तर दिले. न्यायमूर्ती रामास्वामी यांनी टिप्पणी केली की, जोपर्यंत याचिकाकर्ता हिंदू रीतिरिवाजांनुसार आपला धर्म त्यागत नाही, तोपर्यंत जात आणि धर्म सोडून प्रमाणपत्र जारी करण्याच्या विनंतीवर विचार केला जाऊ शकत नाही.

Madras High Court on No Caste Certificate
High Court : ‘पूर्वसूचना न देता माहेरी राहिल्यावर पतीने पत्नीला मारलेली थप्पड क्रूरता नाही’, गुजरात हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

याचिका फेटाळली

धर्मत्यागाचा कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तहसीलदारांचा आदेश रद्द करण्यास नकार दिला. तसेच रिट याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर, न्यायालयाने याचिकाकर्त्याला आपला धर्म त्यागण्याचे आणि त्याबाबतचा पुरावा अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. धर्मत्यागाच्या पुराव्यासह नवीन अर्ज केला तर अधिकारी त्यावर विचार करू शकतात, असे न्यायमूर्ती रामास्वामी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news