foreign trips controversy|विदेशी दौऱ्यांवरून घमासान! भाजपच्‍या गंभीर आरोपांनंतर काँग्रेसकडून PM मोदींचा AI व्हिडिओ शेअर

राहुल गांधींनी २२ वर्षांत ६० कोटी रुपये खर्चून ५४ परदेश दौरे केल्याचा भाजपचा दावा
Rahul Gandhi foreign trips controversy
राहुल गांधींच्‍या विदेशी दौर्‍यावर भाजपने गंभीर आरोप केल्‍यानंतर काँग्रेस पंतप्रधान मोदींचा AI व्हिडिओ शेअर केला आहे. Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi foreign trips controversy

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन संकटामुळे परदेश दौरे रद्द करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आता याच विदेशी दौर्‍यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्‍ये आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झडत आहेत. राहुल गांधी यांनी गेल्या २२ वर्षांत केलेल्या परदेश दौऱ्यांविषयी भाजपने आरोपांची मालिकाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तर काँग्रेसने एक एआय-जनरेटेड (AI-generated) व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींचा परदेश दौऱ्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपने राहुल गांधी केले गंभीर आरोप

भाजपने सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्ट्समध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लंडन, न्यूयॉर्क, इटली, जर्मनी, कतार, व्हिएतनाम, कंबोडिया, मालदीव आणि दुबई यासह एकूण ५४ परदेश दौरे केले आहेत. तसेच यामध्ये त्यांच्या एका 'गुप्त ओमान दौऱ्याचा' देखील समावेश आहे. या दौऱ्यांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे ६० कोटी रुपये आहे. यामध्ये फर्स्ट क्लासचे तिकीट, खासगी विमाने (चार्टर फ्लाईट्स), पंचतारांकित हॉटेल्स, त्यांच्यासोबत असणाऱ्या लवाजम्याचा खर्च आणि सुरक्षा व्यवस्थेचा समावेश आहे.

Rahul Gandhi foreign trips controversy
Raj Thackeray On PM Modi: काटकसरीची सुरुवात आधी स्वतःपासून करा; पंतप्रधान मोदींवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

२०१५ मध्‍ये राहुल गांधीचा खर्च जाहीर उत्पन्नापेक्षा ५.२ पटीने अधिक

भाजपने पुढे दावा केला आहे की, राहुल गांधी यांनी गेल्या दशकात आपले एकूण उत्पन्न सुमारे ११ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. मात्र, २०१५ मधील त्यांच्या एका आशियाई देशाच्या दौऱ्याचा खर्चच सुमारे ४.५ कोटी रुपये होता, जो त्यांच्या त्या वर्षाच्या जाहीर उत्पन्नापेक्षा ५.२ पटीने अधिक होता. तुमच्या या जगभ्रमंतीचा खर्च नेमका कोणी केला?" असा सवाल भाजपने राहुल गांधींना विचारला आहे.

'एफसीआरए' कायद्याचे उल्‍लंघन झाल्‍याचा संशय

भाजपने राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांसाठी पैसा कुठून आला, असा प्रश्न विचारत परदेशी अंशदान नियमन कायद्याचे (FCRA) आणि प्राप्तिकर कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.खासदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना परदेशी आदरातिथ्य स्वीकारण्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेणे 'एफसीआरए'च्या कलम ६ नुसार बंधनकारक असते. मात्र, राहुल गांधींनी अशी कोणतीही परवानगी घेतल्याची सार्वजनिक नोंद उपलब्ध नाही, असा दावा पक्षाने केला आहे.राहुल गांधींच्या प्राप्तिकर रिटर्न, लोकपाल घोषणापत्र किंवा संपत्तीच्या विवरणात या प्रवासाच्या खर्चाचा कुठेही उल्लेख नाही, असा आरोप करत पक्षाने बँक स्टेटमेंट आणि परकीय चलनाची (Forex) माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Rahul Gandhi foreign trips controversy
LPG Shortage Nehru Statement: गॅस टंचाईत आता नेहरूंची एन्ट्री... १९५१ च्या 'त्या' वक्तव्याचा उल्लेख करत पंतप्रधान काय म्हणाले?
Rahul Gandhi foreign trips controversy
Sanjay Raut | "देवासमोर तरी खोटं बोलू नका..." : गॅस टंचाईवरून संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

भाजपने दिला 'सीआरपीएफ'च्या पत्राचा हवाला

१० सप्टेंबर २०२५ रोजीच्या सीआरपीएफ (CRPF) च्या एका पत्राचा हवाला देत भाजपने म्हटले आहे की, राहुल गांधींचे अनेक परदेश दौरे हे बंधनकारक असलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलची माहिती न देताच झाले होते. पक्षाने या मुद्द्याचा संबंध राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या ओमान दौऱ्याशी जोडला आहे.यापूर्वी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दावा केला होता की, पक्षाने सखोल मूल्यांकन करून ६० कोटी रुपयांच्या खर्चाचा हा आकडा काढला आहे.

काँग्रेसने फेटाळलेआरोप, मोदींचा एआय-जनरेटेड व्हिडिओ केला शेअर

काँग्रेसने भाजपचे हे सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. तसेच काँग्रेसने पंतप्रधान मोदींचा एक एआय-जनरेटेड (AI-generated) व्हिडिओ शेअर करत त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, "देशसमोरील आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या मुख्य मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी भाजप हे प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी भाजपवर आरोप केला की, "भाजप देशामधील बेरोजगारी, महागाई आणि सीमावादासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी केवळ चिखलफेक करण्याची मोहीम राबवत आहे."

Rahul Gandhi foreign trips controversy
Congress on PM Modi: 'मोदींची वसुली सुरू': इंधन दरवाढीनंतर काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणाले, 'महागाई-पुरुष'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news