NEET Exam Scam : नीट पेपरफुटी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई

बिहारमधील पाटणा येथून दोघांना अटक
NEET Exam Scam Update
नीट पेपरफुटी प्रकरणी CBI ची मोठी कारवाईFile Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आज (दि.२७ जून) मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बिहारमधील पाटणा येथून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

NEET-UG परीक्षा पेपर लीक प्रकरणात CBI ने अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं मनीष प्रकाश आणि आशुतोष अशी असल्याची माहिती देखील केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

NEET Exam Scam Update
NEET-UG Row : नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

बिहार सरकारने सोमवारी NEET-UG पेपर लीक प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्याबाबत अधिसूचना जारी केली. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पेपरफुटी प्रकरणी पहिल्यांदाच मोठी कारवाई केली आहे.

NEET Exam Scam Update
NEET scam : ७०० विद्यार्थी...३०० कोटी रुपये गोळा करण्‍याचे 'टार्गेट'!

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटीचा प्रकार समोर आल्‍याने देशभरात खळबळ माजली आहे. तब्‍बल २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी ज्‍या परीक्षेवर आपलं भवितव्‍य ठरवतात यातील गैरप्रकार समोर आल्‍याने पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड रोष आहे. ही परीक्षा रद्द करुन फेरपरीक्षा घेण्‍याची आग्रही मागणी केली जात आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news