NEET scam : ७०० विद्यार्थी...३०० कोटी रुपये गोळा करण्‍याचे 'टार्गेट'!

स्टिंग ऑपरेशनमध्‍ये 'नीट'बाबत धक्‍कादायक माहिती समोर
NEET scam
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटीचा प्रकार समोर आल्‍याने विद्यार्थी वर्गात प्रचंड रोष आहे. File Photo

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटीचा प्रकार समोर आल्‍याने देशभरात खळबळ माजली आहे. तब्‍बल २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी ज्‍या परीक्षेवर आपलं भवितव्‍य ठरवतात यातील गैरप्रकार समोर आल्‍याने पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड रोष आहे. ही परीक्षा रद्द करुन फेरपरीक्षा घेण्‍याची आग्रही मागणी केली जात आहे. पेपर फोडणार्‍या रॅकेटने ७०० विद्यार्थ्यांकडून २०० ते ३०० कोटी रुपय गोळ्या करण्‍याचे टार्गेट ठेवले होते, अशी धक्‍कादायक माहिती 'इंडिया टूडे'ने केलेल्‍या स्‍टिंग ऑपरेशनमध्‍ये समोर आली आहे. ( NEET scam)

मार्चमध्‍येच केला होता पेपरफुटीचा दावा

या संदर्भात 'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, आमच्‍या टीमने नीट पेपर फुटीच्‍या नेटवर्कच्‍या सूत्रधारापैकी एक असणार्‍या बिजेंदर गुप्‍ताचा माग काढला. तो यापूर्वी अनेक पेपर फुटी प्रकरणामध्‍ये सहभागी होता. त्‍याला दोनवेळा अटकही करण्‍यात आली आहे. मात्र तो पोलिसांगा गुंगारा देत होता. गेली २४ वर्ष ओडिशा स्‍टार सिलेक्‍शन कमिशन, बिहार लोकसेवा आयोग, मध्‍य प्रदेश लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षाच्‍या पेपरफुटीमध्‍ये त्‍याचा सहभाग होता. मार्च २०२४ मध्‍ये त्‍याचा एक व्‍हिडिओही व्‍हायरल झाला होता. यामध्‍ये त्‍याने दावा केला होता की, "बिहार लोकसा आयोग शिक्षक भरती परीक्षा आणि ओडिशा कनिष्‍ठ अभियंता या पदांसाठी घेतलेल्‍या परीक्षांचे पेपर फोडणारा विशाल चौरसिया हा सध्‍या तुरुंगात आहे. मात्र त्‍याचे रॅकटे २०२४ नीट परीक्षेचा पेपर फोडू शकते."

NEET scam
NEET : इरण्णाच्या मोबाईलमध्ये पैशाची देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे

आरोपी पकडले जातात पुन्‍हा जामीनावर सुटतात पुन्‍हा तोच खेळ...

स्‍टींग ऑपरेशनवेळी छुप्‍या कॅमेर्‍या समोर बोलताना बिजेंदर गुप्‍ता याने सांगितले की, यंदाच्‍या NEET-UG पेपरफुटील प्रमुख सूत्रधार असणारा संजीव मुखिया हा सध्‍या फरार आहे. त्‍याने यंदा ७०० विद्यार्थ्यांना पेपर देवून २०० ते ३०० कोटी रुपये गोळा करण्‍याचे टार्गेट ठेवले होते. पेपर घेवून जाणार्‍या वाहतुकीच्‍या वेळी बॉक्‍स कसे फोडले जाता हेही सांगितले. तसेच या प्रकरणातील आरोपी पकडले जातात पुन्‍हा जामीनावर सुटतात पुन्‍हा तोच खेळ नव्‍याने खेळतात. पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला की काही काळ गोंधळ होता. सध्‍या नीट पेपरफुटीसंदर्भात बिहारमधील आर्थिक गुन्‍हे विभागाचा तपास योग्‍य दिशेने सुरु आहे. मात्र अशा प्रकार परीक्षेत घोटाळा होवू शकतो हे NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्‍या लक्षात येत नाही, असाही दावा त्‍याने केला आहे.

NEET scam
NEET Exam Scam: नीट परीक्षा गोंधळ,सुप्रीम कोर्टात याचिका

वाहतुकी दरम्‍यना प्रश्नपत्रिका असलेले बॉक्स फोडले जातात

काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांना निविदा काढल्याचा दावा करत वाहतुकीदरम्यान प्रश्नपत्रिका असलेले बॉक्स कसे फोडले जातात. लॉजिस्टिक कंपन्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर पोहोचवतात तेथेच पेपरफुटीचा खेळ सुरु होतो. पेपर फोडण्‍यासाठी अनेक वेवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो, असेही त्‍याने म्‍हटलं आहे.

नीट पेपरफुटीचा मास्‍टरमाइंड संजीव मुखिया

स्टिंग ऑपरेशनमध्ये बिजेंद्र गुप्ता याने यंदाच्‍या नीट पेपरफुटीच्‍या सूत्रधारासह त्‍याच्‍या टोळीचा तपशील उघड केला आहे. त्‍याने म्‍हटलं आहे की, यंदाच्‍या नीट पेपरफुटीचा मास्‍टरमाइंड हा संजीव मुखिया आहे. त्‍याच्‍यावर ३० कोटींचे कर्ज आहे. तो सध्‍या कारागृहात असला तरी त्‍याचा मुलगा शिव मुखिया याचा यंदाच्‍या NEET-UG पेपरफुटीत सहभागी आहे. संजीव मुखीया हा सध्‍या कारागृहात आहे. मात्र जामीन मिळाल्‍यानंतर तो पुन्‍हा हा खेळ नव्‍याने सुरु करेल. त्‍याला किती दिवस कारागृहात ठैवणार, असा असा सवाल करत पोलिसही कायद्याच्या नियमाने बांधलेले आहेत, असे सांगत तो व्‍यवस्‍थेमधील त्रुटींवरही बोट ठेवतो.

NEET scam
NEET-UG Row : नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

परीक्षेपूवी दोन तास आधी मिळाला ३२५ मुलांना मिळाली होती प्रश्नपत्रिका

यंदाच्‍या नीट परीक्षेपूर्वी संजीव मुखिया याचा मुलगा शिव मुखिा याने NEET-UG परीक्षेच्या एक दिवस आधी म्‍हणजे ४ मे २०२४ रोजी पाटणा येथील लर्न प्ले स्कूलशी संबंधित मुलांच्या वसतिगृहात सुमारे २५ उमेदवारांना ठेवले होते. दिल्ली आणि पाटणा आणि इतर काही ठिकाणी 300 मुले होती. या सर्व मुलांना ५ मे रोजी झालेल्‍या नीट परीक्षे पूवीं दोन तास आधी प्रश्‍नप्रश्नपत्रिका मिळाली होती, असा दावाही बिजेंदर गुप्‍ता याने केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news