TMC : 'तृणमूलची मुस्लिम व्होट बँक संपणार : 'बाबरी' प्रतिकृतीचे भूमिपूजन करणार्‍या निलंबित आमदार कबीर यांचा इशारा

औवेसींच्‍या पक्षाबरोबर युती करुन पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढणार
Bengal Babri Masjid Showdown
तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर.File Photo
Published on
Updated on

Bengal Babri Masjid Showdown

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे भूमिपूजन केले. १९९२ मध्ये बाबरी मशिदीचे हिंसक पाडकाम ज्या दिवशी झाले, त्याच दिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्‍यांना पक्षाने निलंबित केले आहे. आता निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चौथ्यांदा सत्तेवर येऊ न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच तृणमूलची मुस्लिम व्होट बँक संपेल," अशी घोषणा देत 'पिक्चर अभी बाकी है' अशा फिल्मी स्‍टाईलमध्‍ये ममता बॅनर्जी यांना धमकीही दिली आहे.

२२ डिसेंबर रोजी स्‍वत:चा पक्ष स्‍थापन करणार

आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे भूमिपूजन केले. याच्‍या दुसर्‍या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कबीर यांनी २२ डिसेंबर रोजी आपला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एमआयएम' (AIMIM) सोबत युती करण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुकीत विधानसभेच्या २९४ पैकी १३५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यामुळे आपण राज्याच्या राजकारणात 'गेम-चेंजर' ठरू, असा दावा त्यांनी केला आहे.

Bengal Babri Masjid Showdown
Navjot Singh Sidhu |नवज्योतसिंग सिद्धू राजकारणात करणार 'कमबॅक'? पत्नी म्हणाल्‍या, 'या' अटीवर...

पश्‍चिम बंगालमधील १३५ मतदारसंघात निवडणूक लढणार

"मी एक नवीन पक्ष स्थापन करेन जो मुस्लिमांसाठी काम करेल. मी १३५ जागांवर उमेदवार उभे करेन. मी बंगाल निवडणुकीत गेम-चेंजर बनेन. मी एमआयएमच्या संपर्कात आहे आणि त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहे. ओवैसींशी माझी चर्चा झाली आहे, असा दावाही त्‍यांनी केला. दरम्‍यान, याबाबत ओवैसी यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Bengal Babri Masjid Showdown
Gautam Gambhir : "क्रिकेटशी संबंध नसलेल्यांनी ढवळाढवळ करू नये!" : गौतम गंभीर यांनी थेट IPL संघमालकालाच सुनावले

तृणमूल आपले पुढील सरकार स्थापन करू शकणार नाही

"मी भाजपला बंगालमध्ये सत्तेत येऊ देणार नाही. तसेच, तृणमूल आपले पुढील सरकार स्थापन करू शकणार नाही. भारतातील अनेक उद्योग मला मदत करणार आहेत. भारतातील मुस्लिमांकडे मोठा निधी आहे; ते बाबरी मशीद बांधण्यास मदत करणार आहेत, असा दावाही निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी केला.

Bengal Babri Masjid Showdown
Supreme Court : 'या सर्व गोष्टींबद्दल भगवान श्रीकृष्णांना काय वाटत असेल?’ : सर्वोच्‍च न्‍यायालयाने अशी टिप्‍पणी का केली?

पायाभरणी कार्यक्रमाला मोठी गर्दी

कबीर यांच्या 'बाबरी मशिदी'च्या पायाभरणी कार्यक्रमाला शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आठ लाख लोकांनी सहभाग घेतला, असा दावा त्यांनी केला. या वेळी विटा आणि रोख रकमेच्या स्वरूपात देणग्यांचा ओघ सुरू झाला. मुरशिदाबाद आणि मालदा जिल्ह्यातील शेकडो ग्रामस्थ देणगी देण्यासाठी सामील झाल्याने राष्ट्रीय महामार्ग-१२ जाम झाला होता. उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण २४-परगणा येथील कॅनिंगसारख्या दूरच्या ठिकाणांहून विटांनी भरलेले ट्रक आणि ट्रॅक्टर आले होते.काहींनी कबीर यांच्या प्रयत्नांना १९९२ मध्ये १६ व्या शतकातील मशीद पाडल्या गेलेल्या अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर काहींनी तृणमूलच्या कथित अत्याचारांविरुद्धचा तो निषेध असल्याचे म्हटले.

Bengal Babri Masjid Showdown
Maharashtra politics : राजकीय 'वादा'नंतर एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण आले एका व्यासपीठावर!

भाजपचा हुमायूं कबीर यांच्यावर हल्लाबोल

बंगाल भाजपचे प्रमुख सामिक भट्टाचार्य यांनी मशीद वादाला "तृणमूलचा नियोजित अजेंडा" म्हटले आहे. कबीर यांचे निलंबन केवळ दाखवण्यासाठी आहे, असा दावा करत त्यांनी बॅनर्जींचा पक्ष "बाबरच्या बाजूने आहे, पण आम्ही नाही," असे स्पष्ट केले. 'बाबरी मशीद' बंगालमध्ये कधीही स्वीकारली जाणार नाही, असे केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी ठामपणे सांगितले. "मशीद बांधण्यास कोणीही विरोध करत नाही, पण बाबरच्या नावावर मशीद बांधणे म्हणजे हिंदूंचा अपमान आणि त्यांना भडकावण्याचा प्रयत्न आहे. हिंदू समुदाय याला योग्य उत्तर देईल," असा इशाराही त्‍यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news