उमेश पाल हत्या प्रकरणी आपल्या कुटुंबाला मुद्दामहून गुंतवण्यात आले आहे, असा दावाही अतिकने याचिकेत केला आहे. अतिक हा सध्या अहमदाबाद मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. उत्तर प्रदेश पोलीस रिमांड घेऊन आपणास अहमदाबादहून प्रयागराजला नेऊ शकतात आणि तसे करताना वाटेत आपल्याला मारले जाऊ शकते, असेही अतिक याने म्हटले आहे.