दहशतवादावर प्रहार ! ‘एनआयए’च्‍या दोषसिद्धीचे प्रमाण पोहचले ९३.६९ टक्‍क्‍यांवर | पुढारी

दहशतवादावर प्रहार ! 'एनआयए'च्‍या दोषसिद्धीचे प्रमाण पोहचले ९३.६९ टक्‍क्‍यांवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) मागील काही वर्षांत केलेल्‍या धडक कारवाईचे ठोस परिणाम आता दिसू लागले आहेत. लखनौ आणि अहमदाबाद येथील विशेष न्यायालयांनी दोन वेगवेगळ्या निकालांमध्ये दहा आरोपींना शिक्षा सुनावल्यामुळे ‘एनआयए’च्‍या दोषसिद्धीचे प्रमाण ९३.६९ टक्‍क्‍यांवर पोहचले आहे. दोन्ही प्रकरणील आरोपीं देशात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याशी संबंधित होते, असे ‘एनआयए’ने म्‍हटले आहे. ( NIA conviction rate )

NIA conviction rate : आणखी एक मैलाचा दगड गाठला- एनआयए

एनआयए विशेष न्यायालयाने, लखनौने सोमवारी ISIS कानपूर प्रकरणात सात आरोपींना फाशीची शिक्षा आणि एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अहमदाबादमधील विशेष एनआयए न्‍यालयाने आयएसआयएस राजकोट प्रकरणातील दोन आरोपींना १० वर्षांची शिक्षा सुनावली.या दोन निकालामुळे आता एनआयए प्रकरणांमध्ये दोषसिद्ध होण्याचे प्रमाण ९३.६९ झाल्‍याचे एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे. तपास संस्‍थेने वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍याच्‍या आधारे आपली तपासाची परंपरा कायम ठेवली आहे. त्‍यामुळे गुन्‍हा दाखल झाल्‍यापासून गुन्‍हा सिद्धी होण्‍याचे प्रमाणाने आणखी एक मैलाचा दगड गाठला असल्‍याचेही तपास संस्‍थेने आपल्‍या निवेदनात नमूद केले आहे.

आतिफ मुझफ्फर, मोहम्मद दानिश, आसिफ इक्बाल उर्फ रॉकी, मोहम्मद आतिफ उर्फ आतिफ इराकी, मोहम्मद फैसल, मोहम्मद अझहर आणि गौस मोहम्मद खान हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर नगरचे राहिवासी आहेत. त्‍यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील सय्यद मीर हुसेन आणि मृतक मो. सैफुल्लाने हाजी कॉलनी (लखनऊ) येथे लपण्याचे ठिकाण तयार केले होते. तसेच काही आयईडी तयार करून त्यांची चाचणी घेतली होती. उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी स्‍फोट घडविण्‍याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तपासात आयईडी बनवणाऱ्या आरोपींची अनेक छायाचित्रे आणि शस्त्रे, दारुगोळा आणि आयएसआयएसचा ध्वजही सापडला होतो.

७ मार्च २०१७ रोजी झालेल्या रेल्वे स्फोटात १०जण जखमी झाले होते.हे आठ आरोपी जण दहशतवादी संघटना ISIS चा प्रचार करण्यासाठी आणि भारतात दहशतवादी हल्‍ले घडवून आणण्‍यासाठी एकत्र आले होते. हाजी कॉलनीत ७ मार्च २०१७ रोजी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (ATS) सोबत झालेल्या गोळीबारात सैफुल्ला नावाचा  आरोपी ठार झाला. या प्रकरणी लखनौ एटीएसने ८मार्च २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने १४ मार्च २०१७ रोजी पुन्‍हा याप्रकरणी गुन्‍हा नोंदवला होता. ३१ऑगस्ट २०१७ रोजी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.या खटल्यानंतर, या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी आठ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.

लखनौतील एनआयए विशेष न्यायाधीशांनी मंगळवार,२८ फेब्रुवारी रोजी आरोपींना विविध गुन्ह्याखाली दोषी ठरवत शिक्षा सुनावली. मोहम्मद फैसल, गौस मोहम्मद खान, मोहम्मद अझहर, आतिफ मुझफ्फर, मोहम्मद दानिश, सय्यद मीर हुसैन आणि आसिफ इक्बाल या सात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर मोहम्मद आतिफला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्‍याचे ‘एनआयए’ने आपल्‍या निवेदनात स्‍पष्‍ट केले आहे.

दुसरीकडे, ISIS-संबंधित आणखी एका प्रकरणात सोशल मीडियाचा वापर कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि  भरतीसाठी NIA ला आढळून आल्यानंतर गुजरात NIA विशेष न्यायालयाने दोन दहशतवाद्यांना दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तपासादरम्यान दोन्ही आरोपी वसीम आरिफ रामोदिया उर्फ निंजा फॉक्स आणि नईम आरिफ रामोदिया हे दोघे भाऊ गुजरातमधील राजकोटचे रहिवासी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. लखनौ आणि अहमदाबाद येथील विशेष न्यायालयांनी दोन वेगवेगळ्या निकालांमध्ये दहा आरोपींना शिक्षा सुनावल्यामुळे ‘एनआयए’च्‍या दोषसिद्धीचे प्रमाण ९३.६९ टक्‍क्‍यांवर पोहचले असल्‍याने एनआयएने आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button