Assembly Bypoll results | हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विजयी, पंजाबच्या जालंधर पश्चिमेची जागा AAP ने जिंकली

पोटनिवडणुकीत INDIA आघाडीचा भाजपला धक्का
Assembly Bypoll results
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७ राज्यांतील विधानभा पोटनिवडणुकीच्या १३ जागांसाठी (Assembly Bypoll results) आज शनिवारी मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आम आदमी पक्षाने पंजाबच्या जालंधर पश्चिमेची जागा जिंकली आहे. येथून आपचे मोहिंदर भगत विजय झाले आहेत. त्यांनी भाजपचे शीतल अंगुराल यांचा सुमारे ३७ हजार मतांनी पराभव केला. दरम्यान, सात राज्यांतील १३ पैकी १० जागांवर INDIA आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Assembly Bypoll results
Assembly Bypoll results | ७ राज्यांतील १३ जागांचे पोटनिवडणूक निकाल, हिमाचलमध्ये काँग्रेस, बंगालमध्ये TMC ची आघाडी

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी इंडिया आघाडीने विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला कडी टक्कर दिली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर हिमाचल प्रदेशातील हमीपूर विधानसभेच्या जागेवर भाजपचे आशिष शर्मा यांनी ‍विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पुष्पिंदर वर्मा यांचा सुमारे १,५०० मतांनी विजय मिळवला.

दरम्यान, विधानसभेच्या उर्वरित १२ जागांपैकी काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल ४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि डीएमके प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. बिहारच्या रुपौली जागेवर अपक्ष उमेदवार शंकर सिंह आघाडीवर आहेत. येथे जेडीयूचा उमेदवार पिछाडीवर आहे.

Assembly Bypoll results
Maharashtra MLC Election Result | दोस्तीत कुस्ती...! 'शेकाप'च्या जयंत पाटलांचा गेम कोणी केला?

पोटनिवडणुकीच्या १३ जागांमध्ये बिहारमधील रुपौली, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर, नालागढ, मध्य प्रदेशातील अमरवाडा, पंजाबमधील जालधंर पश्चिम, तामिळनाडूतील विक्रवंडी, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला यांचा समावेश आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेसच्या कमलेश ठाकूर विजयी

राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत तीन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिला होता. यामुळे हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या तीन जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने पक्षाने या जागेवरुन मैदानात उतरवले. काँग्रेसने देहरा येथून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्या येथून विजयी झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news