Assembly Bypoll results | ७ राज्यांतील १३ जागांचे पोटनिवडणूक निकाल, हिमाचलमध्ये काँग्रेस, बंगालमध्ये TMC ची आघाडी

कोण कुठे आघाडीवर?
Assembly Bypoll results
७ राज्यांतील विधानभा पोटनिवडणुकीच्या १३ जागांचे निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७ राज्यांतील विधानभा पोटनिवडणुकीच्या १३ जागांचे निकाल (Assembly Bypoll results) आज शनिवारी जाहीर होत आहे. त्यासाठी मतमोजणी सुरू आहे. बिहारमधील रुपौली, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर, नालागढ, मध्य प्रदेशातील अमरवाडा, पंजाबमधील जालधंर पश्चिम, तामिळनाडूतील विक्रवंडी, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला या जागांचे निकाल आज जाहीर होत आहेत.

कोण कुठे आघाडीवर?

हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलौर या जागांवरही काँग्रेस आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मनिकतला या जागांवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंजाबच्या जालंधर पश्चिम जागेवर आप आघाडीवर आहे. बिहारच्या रुपौली येथील पोटनिवडणुकीच्या जागेवर जेडीयू आघाडीवर आहे. मध्य प्रदेशातील आवरवाडा जागेवर भाजप आघाडीवर आहे. तामिळनाडूच्या विक्रवंडी जागेवर डीएमकेने आघाडी घेतली आहे.

Assembly Bypoll results
राज्यसभा निवडणूक निकाल : आज ते जिंकले असतील, पण आम्ही उद्या पाहू…- संजय राऊत 

हिमाचल प्रदेश

सुरुवातीच्या कलानुसार, हिमाचल प्रदेशातील तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. देहरा विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर पहिल्या चार फेरीतील मतमोजणीत पिछाडीवर होत्या. पण त्यानंतर त्यांनी आघाडी घेतली. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पाच फेरीतील मतमोजणीनंतर कमलेश ठाकूर यांनी भाजप उमेदवार होशियार सिंह यांच्यावर ६०० हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.

हिमाचलमध्ये तीन जागांवर पोटनिवडणूक

राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत तीन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिला होता. यामुळे हिमाचल प्रदेशातील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या तीन जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने पक्षाने या जागेवरुन मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने देहरा येथून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.

Assembly Bypoll results
बहार विशेष : अमेरिकेची निवडणूक वादळी ठरणार!

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमध्ये बसपा, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिहेरी लढत होत आहे. तर बद्रीनाथ येथील जागेवर भाजपचे राजेंद्र भंडारी आणि काँग्रेसचे उमेदवारी लखपत सिंह बुटोला यांच्यात थेट लढत होत आहे.

पंजाब

पंजाबमधील जालंधर पश्चिम पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत आपची कामगिरी खालावली होती. आपने येथे मोहिंदर भगत यांना मैदानात उतरवले आहे. तर सुरिंदर कौर काँग्रेसचे उमेदवार आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, येथे मोहिंदर भगत सुमारे ६ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

बिहार

बिहारमधील रुपौली येथून आरजेडीने पाचवेळा आमदार राहिलेल्या बीमा भारती यांना तिकीट दिले आहे. तर जेडीयूने कलाधर मंडल यांना उमेदवारी दिली आहे. आरजेडीने बीमा भारती यांना पूर्णिया येथून लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती. पण तेथे त्यांचा पराभव झाला होता.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील छिंदवाडाच्या अमरवाडा जागेवरील पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने येथून कमलेश शहा आणि काँग्रेसने धीरन शहा इनवती यांना रिंगणात उतरवले आहे.

तामिळनाडू

तामिळनाडूतील येथील विक्रवंडी पोटनिवडणुकीत डीएमकेचे अन्नियूर शिवा, पीएमकेचे केसी अंबूमणी, नाम तमिलर काचीचे डॉ. अभिनय यांच्यात लढत होत आहे. AIADMK ने या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत पक्षाने इथे त्यांचा उमेदवार उभा केलेला नाही. दरम्यान, विक्रवंडी येथे डीएमकेचा उमेदवार आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news