Asha Bhosle hospitalized | आशा भोसले रुग्णालयात दाखल; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

Asha Bhosle hospitalized | लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना
Asha Bhosle hospitalized
Asha Bhosle hospitalized Pudhari
Published on
Updated on

Asha Bhosle hospitalized

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले (९२) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' एक्‍स पोस्‍ट करत आपली चिंता व्यक्त केली असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो...

पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आशा भोसले जी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने मनाला अतिशय वेदना झाल्या. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

Asha Bhosle hospitalized
World Marathi Conference Nashik 2026 |'एआय' युगातही अभिजात साहित्याचे मूल्य सर्वाधिक

छातीत संसर्ग आणि थकव्यामुळे उपचार सुरू

‘माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे', अशी माहिती आशा भोसलेंची नात जनाई नात यांनी इन्स्टाग्रामद्वारे दिली. लवकरच त्यांची प्रकृती सुधारेल अशी आम्हाला आशा आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, आम्ही वेळोवेळी प्रकृतीबाबत माहिती देऊ, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले होते.

Asha Bhosle hospitalized
‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...

वयाच्या ९२ व्या वर्षीही उत्साह कायम

वयाची नव्वदी ओलांडली असली तरी आशाताईंचा उत्साह आजही तरुणांना लाजवणारा आहे. २०२३ मध्ये आपल्या ९० व्या वाढदिवसाला त्यांनी दुबईत तीन तासांचा लाईव्ह कॉन्सर्ट केला होता. त्या वेळी त्यांनी म्हटले होते की, "संगीत हाच माझा श्वास आहे. संगीतामुळेच मी कठीण प्रसंगांवर मात करू शकले." विशेष म्हणजे, २०२४ मध्ये दुबईतील एका कार्यक्रमात त्यांनी प्रसिद्ध 'तौबा तौबा' गाण्यावर ठेका धरत विकी कौशलची केलेली 'हुक स्टेप' सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल झाली होती. आशा भोसले यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, २००० मध्ये 'दादासाहेब फाळके पुरस्कार' आणि २००८ मध्ये 'पद्मविभूषण' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news