

नाशिक 'एआय'ने अनेक आव्हाने उभी केली आहेत, कवीं समोर तर प्रश्नच उपस्थित झाला आहे. चॅट-जीपीटीच्या माध्यमातून कविता असो की लेख, कोणतीही माहिती तत्काळ मिळत आहे मात्र, अभिजात साहित्याला ते आव्हान देऊ शकत नाहीत. मशीन लर्निंगमधील साहित्य हे भेसळ करून झालेले असते, ते वैचारिक नसते. आजही सारस्वतांमध्ये नवी शक्ती येते. नवीन साहित्य निर्मितीसाठी मराठी हेच अभिजात साहित्य आहे. एआयचा उपयोग करून मराठीच्या विकासामध्ये भर घालता येईल, मराठी अभिजात आहे, तिला सर्वदूर कसे पोहोचवता येईल, यासाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील केटीएचएम महाविद्यालयाच्या कविवर्य कुसुमाग्रज नगरीत शुक्रवारी (दि. २७) चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, मधू मंगेश कर्णिक, खा. राजाभाऊ वाजे, खा. शोभा बच्छाव, खा. भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. माणिकराव कोकाटे, आ. किशोर दराडे, यांच्यासह साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मराठी संवर्धन करणारे साहित्यिक आणि पुरस्कारार्थी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री फडणवीस व उपस्थितांनी वंदन केले.
डॉ. भालचंद्र नेमाडे - साहित्य भूषण पुरस्कार
श्रीनिवास विनायक कुलकर्णी - विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार
शांतिब्रह्म गुरुवर्य मारुतीबाबा कुरुेकर - विश्व मराठी संमेलन संमेलन विशेष पुरस्कार
दिलीप धोंडगे - डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी - डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्था)
विनोद सूर्यनारायण कुलकर्णी - कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा - कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्था)
निर्मल प्रकाशन, नांदेड - श्री. पु. भागवत पुरस्कार (संस्था)
मुख्यमंत्री म्हणाले की, विविध देशांतील मराठी भाषेचे पूजक असलेले मराठीप्रेमी हे त्या-त्या देशांतील प्रचारक आहेत. मराठी भाषा अभिजात आहेच, तिचा परदेशातही डंका वाजू लागला आहे, त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. नुकताच दावोस येथे जाऊन आलो, तेव्हा मराठी माणसाने केलेले स्वागत मनाला भावून टाकणारे होते. परदेशी नागरिकांनाही मराठी गाणी आत्मसात या संवादातून कळले. ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाची संकल्पना जगाला शिकविली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ज्यांना पुरस्कार जाहीर केले, त्या पुरस्कारांची उंची मोठी आहे. त्यांच्यामुळे या पुरस्कारांचे महत्त्व वाढले आहे.
मराठीचा रथ पुढे पुढे जात राहील, गतीने तो सारख्याच जिंके ठेवा राहील. मराठी ही अशी एक भाषा आहे की तिचे सर्वाधिक साहित्य हे विविध बोली भाषेतून दैनंदिन जीवनात असल्याचे धन निर्माण करतात. मराठी भाषेतील साहित्य व परंपरेमुळे जीवन समृद्ध झालेले आहे. सर्वच भाषांमध्ये नाट्य पाहायला मिळतात मात्र आजही देशात सर्वात समृद्ध नाटके व रसिक प्रतिसाद असलेली मराठी नाटके लोकप्रिय आहेत. त्याला प्रतिसाद देणारा रसिक मोठा आहे. नाशिक ही भूमी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आहे. जवळच त्यांचे भगूर हे गाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीचे धडे दिले. तात्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी भाषाशुद्धी शिकवली तो काळ असा होता की आक्रमणे अधिक होत असताना, प्रमाण भाषेचा कोश जिवंत ठेवण्याची वेळ होती. प्रमाण भाषेचा कोश छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केला, त्यात अनेक शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही शुद्ध दिले. विधानसभा व विधान परिषद हे शब्द सुद्धा त्यांनी दिले आहेत. हे संमेलन मराठी भाषा गौरवदिनी होत आहे, परंतु भाषेचा गौरव करून ती जिवंत नाही तर आपली भाषा जीवनाचे वाणिज्य चालवण्यासाठी मदत करते तेव्हा ती जिवंत राहते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन चरित्र चालवणारी भाषा करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
लॅग्वेज लॅब तयार करून शाळांना देणार
शाळांमध्ये मराठी अनिवार्य केली. मात्र अजूनही अनेक शाळांमध्ये त्यांनी अंमलबजावणी होत नाही संवर्धने निकष न आल्यामुळे पुढे करून ती टाळली जाते, मात्र यापुढे एआयच्या माध्यमातून लॅग्वेज लॅब तयार करून ती शाळांना देऊ, त्यातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करता येईल, मराठी बोलता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे, यासाठी आग्रह राहील.
२०२८ मध्ये परदेशात मराठी संमेलन करणार
भाषेचा अभिमान आहे, मराठी असल्याचा स्वाभिमान आहे, हा अभिमान साजरा करण्यासाठी विश्व मराठी संमेलन परदेशातही करण्याचे विचार आहे. या वर्षी नाशिकला हे संमेलन होत आहे, पुढच्या वर्षी विदर्भाला त्याचा मान मिळाला, अशी आग्रही मागणी असेल. त्यानंतर पुढचे मराठी संमेलन हे परदेशात होईल. कारण मराठी ही विश्वभाषा आहे तर विश्वभरातील ठिकठिकाणी मराठी संमेलन झाली पाहिजे आणि ती करण्याच्या पूर्ण प्रयत्न केला जाईल.
मराठी भाषा विभागाने उदय सामंत यांनी आतापर्यंत मागील वर्षाच्या विश्व मराठी संमेलनात दिग्गज उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, त्यांच्याकडून मराठी भाषा मंत्री म्हणून मी निधी खेचून घेण्याची मागणी केली होती. त्यांनी २०० कोटी वाढवून दिल्याने आज मराठी भाषा विभागाचे वार्षिक बजेट ३६५ कोटी झाले आहे. महाराष्ट्रातील बोली भाषांचा उत्सव आज आहे. बोली भाषांची माहिती पुढच्या पिढीला अवगत व्हावी हा या मागचा प्रयत्न आहे. आजच्या विश्व संमेलनात काढण्यात आलेल्या शोभायात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद नाशिककरांनी दिला नाशिककरांचे कौतुक आणि अभिमान आहे. खऱ्या अर्थाने कुसुमाग्रजांना आदरांजली ठरली. गेल्या सव्वा वर्षात मराठी भवनाचे काम दिसत नाही. तांत्रिक कारणांमुळे मराठी भाषा भवनाचे काम मागे राहिले, मात्र पुढच्या फेब्रुवारीला ते पूर्ण होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल, याची खात्री देतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने संथला मराठी भाषेचे वैश्विक भवन उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी भाषेचे ७५ ग्रंथ पूर्ण करण्याचे आहेत, आतापर्यंत ४५ ग्रंथ पूर्ण झाले आहेत, उर्वरित संच आगामी काळात पूर्ण होतील. मराठी भाषा विश्वरूप भाषा आहे, मराठी भाषेचे वैभव जगातील सर्वात अग्रेसर राहिले पाहिजे, यासाठी पुढच्या तीन महिन्यात मराठी अनुवाद समितीची स्थापना केली जाईल, याची ग्वाही दिली.
निवृत्ती महाराज समाधी संकुलाला ५० लाख
त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थेने शासनाला पत्र देऊन निधीची मागणी केली होती. मात्र ती काही कारणास्तव बारगळली होती. त्याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीशी व्यक्त करीत संस्थेची मागणी मंजूर झाली असल्याची घोषणा करीत यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ५० लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
पुरस्काराचे नाव पुकारताच वारकऱ्यांचा जल्लोष अन् गोंधळ
शांतीब्रह्म, गुरुवर्य मारोतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलन विश्व पुरस्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करताच त्यांच्यासोबत आलेल्या ३०० वारकऱ्यांच्या समुदायाने टाळ-मृदंगांच्या निनादात जल्लोष केला. त्यामुळे काहीवेळ काहीतरी गोंधळ झाल्यासारखे झाले. त्यामुळे मुख्यमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ मंचावरून उतरत वारकऱ्यांच्या दिशेने जात त्यांना शांत केले. तसेच त्यांना कार्यक्रमात पुढे बोलावून बसविण्यात आले.