‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...

'स्फोटांचा आवाज इतका भयंकर होता की त्यांचे संपूर्ण घर हादरून गेले'
‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...
‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...file photo
Published on
Updated on

vishnu manchu shares horrifying missiles video in dubai sky amid us israel iran war fans shocked

पुढारी ऑनलाईन

अभिनेता आणि निर्माता विष्णु मांचू सध्या दुबईत आहे. त्याने दुबईतील परिस्थितीबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. रात्रीच्या वेळी आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत होती, असे त्याने सांगितले. स्फोटांचा आवाज इतका भयंकर होता की त्यांचे संपूर्ण घर हादरून गेले. आकाशात दिसणाऱ्या क्षेपणास्त्रांचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे.

‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...
'मला भीती वाटली होती' तेंव्हा विजय देवरकोंडाला रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणे वाटले होते विचित्र

अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (28 फेब्रुवारी) इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले केले. त्यानंतर इराणनेही मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण मिडिल ईस्टमध्ये खळबळ उडाली आहे. दुबईतही हल्ले होत असून तेथील आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत आहेत. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माते विष्णु मांचूने दुबईतील भीषण दृश्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दुबईतील परिस्थितीबद्दल काय म्हणाला अभिनेता?

विष्णु मांचू सध्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने तेथून एक हादरवून टाकणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 28 फेब्रुवारीच्या रात्री आकाशात क्षेपणास्त्रे स्पष्टपणे दिसत होती आणि हवेत झालेल्या स्फोटांच्या गोंगाटामुळे घर प्रचंड हादरले, असे त्याने सांगितले. या स्फोटांच्या आवाजामुळे त्यांची छोटी मुलगी आयारा खूप घाबरली होती. अशा परिस्थितीत मुलगी घाबरलेली पाहणे आपल्यासाठी खूप कठीण होते, असेही त्यांनी म्हटले.

‘आकाशात क्षेपणास्त्रे…’ दुबईत कुटुंबासह अडकला प्रसिद्ध अभिनेता, भीषण व्हिडीओ केला शेअर; म्हणाला – स्फोटांनी...
Khamenei killed: अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार; तिसऱ्या महायुद्धाचे सावट

विष्णु मांचूंनी त्यांच्या X (ट्विटर) हँडलवर हा भितीदायक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले— “कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईत आलो आहे. आकाशात क्षेपणास्त्रे दिसत आहेत. स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे आमचे घर हादरले आणि छोटी आयारा घाबरली आहे. शांतीसाठी प्रार्थना करतो. जगातील कोणत्याही मुलाला आपल्या घरावरून युद्धाचे आवाज ऐकत मोठे व्हावे लागू नये. नागरिकांच्या सुरक्षेसाठी यूएईच्या संरक्षण दलांचे आभार. असे क्षण आपल्याला आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव करून देतात. शक्ती आणि शांतीसाठी प्रार्थना. हर हर महादेव.”

अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनाही त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते त्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, परिस्थिती बिघडत असताना अभिनेत्री सोनल चौहानही दुबईत अडकल्या असल्याचे समोर आले आहे. त्यांनी X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींकडे मदतीची विनंती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news