CRIME NEWS : 'फेसबुक लाईव्ह'वेळी थरार! मेडिकल स्‍टोअरबाहेर 'ड्रग'विरोधी कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

पंजाबमधील भटिंडा येथे मेडिकल स्‍टोअरमधील धक्‍कादायक घटना कॅमेर्‍यात कैद
Parwinder Singh Jhota shot dead Bathinda
Published on: 
Updated on: 

Parwinder Singh Jhota shot dead Bathinda : पंजाबमध्ये अंमली पदार्थांविरुद्ध मोहीम राबवणारे कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची मंगळवारी सकाळी मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. परविंदर सिंग भटिंडा येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये 'स्टिंग ऑपरेशन' करत असताना त्यांचा स्टोअर मालकाशी वाद झाला. या वादादरम्यान मेडिकल स्टोअरच्या मालकाने झोटा यांच्यावर गोळ्या झाडल्या. दुकानाबाहेर फेसबुक लाईव्ह करत असतानाच ही थरकाप उडवणारी घटना घडली.

परविंदर सिंग कोण होते?

परविंदर सिंग झोटा हे बऱ्याच काळापासून अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध आवाज उठवत होते. ते एका अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (अँटी-ड्रग ब्रिगेड) सक्रिय सदस्य होते. अलीकडेच त्यांनी मेडिकल स्टोअर्सविरुद्ध मोहीम सुरू केली होती; तिथे अंमली गोळ्या, सिंथेटिक ड्रग्ज आणि इतर प्रतिबंधित पदार्थ विकले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Parwinder Singh Jhota shot dead Bathinda
Crime News: प्रेमसंबंध तोडल्याचा राग; ७० हून अधिक खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

फेसबुक लाईव्हदरम्यान नेमके काय घडले?

मंगळवारी परविंदर सिंग झोटा यांनी मानसा येथील एका मेडिकल स्टोअरबाहेर जाऊन फेसबुक लाईव्ह सुरू केले. सुमारे पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ते एका वृद्ध व्यक्तीसोबत उभे असल्याचे दिसत आहेत. या दुकानातून अमली पदार्थ खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर झोटा आणि मेडिकल स्टोअर मालकामध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली. त्यांनी अंमली पदार्थांची विक्री केल्याबद्दल मालकाला जाब विचारला. व्हिडिओमध्ये दुकानदाराच्या हातात पिस्तूल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वादादरम्यान झोटा दुकानदाराला "मार मला, मार मला," असे म्हणताना ऐकू येतात. तसेच, "तुझ्याकडे पिस्तूल का आहे?" असा सवालही त्यांनी केला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तातडीने पोलिसांना फोन करण्यास आणि इतरांना बोलावण्यास सांगितले. झोटा दुकानदाराला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगत होते.यावेळी जोरदार वाद झाला आणि त्यादरम्यान स्टोअर मालकाने शस्त्र काढून झोटा यांच्यावर गोळी झाडली.

Parwinder Singh Jhota shot dead Bathinda
Crime News: पतीची हत्या करून मृतदेहाखाली ठेवला जिवंत साप; पत्नी आणि प्रियकराचा धक्कादायक कट उघड

गोळीबारानंतर आरोपी पसार

गोळी लागल्यानंतर परविंदर झोटा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मेडिकल स्टोअरपासून काही अंतरावरच ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या केमिस्टची ओळख अश्वनी कुमार अशी पटली आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे.

परविंदर सिंग आधीही आले होते चर्चेत

परविंदर सिंग झोटा यांनी यापूर्वी २०२३ मध्ये एका मेडिकल स्टोअर मालकासोबत झालेल्या वादानंतर प्रकाशझोतात आले होते. १२ जुलै २०२३ रोजी त्यांच्या आणि समर्थकांमध्ये एका दुकानदाराशी वाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी झोटा आणि त्यांच्या सहकऱ्यांवर मारहाण, दंगल आणि बेकायदा प्रवेश केल्याचे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यांना जुलै २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती आणि दोन महिन्यांनी त्यांची सुटका झाली होती.

Parwinder Singh Jhota shot dead Bathinda
Pune Crime News | पुण्यातील धायरीत थरार! दुचाकीवर पत्नीचा मृतदेह घेऊन चाललेल्या पतीला पोलिसांच्या सतर्कतेमुळे अटक

राजकीय वातावरण तापले

दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी भगवंत मान सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'आप' सरकारच्या 'युद्ध नशियां विरुद्ध' या मोहिमेच्या प्रभावीपणावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपचे नेते सुनील जाखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, या हत्येने पंजाब सरकारच्या नशाविरोधी मोहिमेचा बुरखा फाडला आहे. "मेडिकल दुकानांमधून होणारी नशिल्या पदार्थांची विक्री रोखणे ही ड्रग इन्स्पेक्टरची जबाबदारी नाही का?" असा सवाल त्यांनी केला.दुसरीकडे, काँग्रेस नेते अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, झोटा यांची हत्या हे पंजाबमधील कोलमडलेली कायदा व सुव्यवस्था आणि अपयशी ठरलेल्या 'युद्ध नशियां विरुद्ध' मोहिमेचे थेट परिणाम आहेत. या खळबळजनक घटनेमुळे पंजाबमधील नशिल्या पदार्थांच्या बेकायदा विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news