

प्रयागराज; पुढारी वृत्तसेवा
२०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीचे गणित सोपे नाही. जाट हा उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात प्रमुख महत्वाचा फॅक्टर आहे. या पश्चिम भागात राष्ट्रीय लोकदल, आरएलडीचा प्रभाव आहे. यावेळेस माजी पंतप्रधान चरणसिंह यांचे पणतू जयंत चौधरी यांच्या नेतृत्वात रालोद अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत भाजपचा फोकस मथुरा जन्मभूमीवर आहे. जो की अयोध्या आणि वाराणसी सोबतच प्रमुख मंदिरापैकी एक आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात प्रचार करत आहेत. या पश्चिम भागात १०० पेक्षा अधिक जागा आहेत. येथे तीन टप्प्यांत मतदान होईल.
केंद्र सरकारने रद्द केलेल्या तिन्ही कृषी कायद्यामुळे भाजपची लोकप्रियता कमी झाल्याचे बोलले जाते. २०१७ साली भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशच्या या भागातून ७६% जागा जिंकल्या होत्या. अमित शहा यांनी आज वृंदावनच्या बाके बिहारी मंदीरात पुजा केली. मथुरेत अमित शहा म्हणाले की भाजपच सरकार आल्यापासून गुन्हेगारी कमी झाली. उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आले.
अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले आहेत की तुमच्यासोबत येत असलेल्या लोकांकडून भरपूर पैसा बाहेर पडत आहे. गुंडगिरी, दहशतवाद मुक्त शासन देण्याचे काम योगी सरकारने केले. अखिलेश यादव तुम्ही मोफत वीज देणार असल्याची गोष्ट करता तुम्हाला तर वीज पुरवठाही करता आला नाही. तुम्ही काय मोफत वीज देणार नाही.
अयोध्या आणि वाराणसी बरोबर मथुरा ही हिंदूंसाठी प्रमुख स्थळ आहे. योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य दोघेही नुकतेच कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या पुर्नबांधणीबाबत बोलले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २९ डिसेंबरला मथुरेत एका रॅलीमध्ये बोलले होते की अयोध्या आणि वाराणसीनंतर नंतर काय मथुराला मागे सोडले जाऊ शकते? अयोध्या आणि काशीतही भव्य राम मंदिर होत आहे आता मथुरेत मंदिर बांधण्याची वेळ आहे.
हेही वाचलत का?