High Court: 44 वर्षांनंतर मिळाला न्याय! 100 वर्षांच्या आरोपीची हत्या प्रकरणातून अखेर निर्दोष मुक्तता

High Court Murder Case: 44 वर्षे जुन्या हत्या प्रकरणात जवळपास 100 वर्षांच्या धनी राम यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मानसिक त्रास लक्षात घेता अखेर आरोपीला दिलासा देण्यात आला.
Allahabad High Court Murder Case
Allahabad High Court Murder CasePudhari
Published on
Updated on

Allahabad High Court Murder Case: जवळपास चार दशकांहून अधिक काळ न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अखेर दिलासा मिळाला आहे. 44 वर्षे जुन्या हत्या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेल्या जवळपास 100 वर्षांच्या धनी राम यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

बुधवारी दिलेल्या निकालात न्यायालयाने सांगितलं की, आरोपी गेली अनेक वर्षे या खटल्याचा मानसिक ताण सहन करत होता. याचिका तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रलंबित राहणं, तसेच आरोपीचं वाढलेलं वय लक्षात घेता त्याला दिलासा देणं योग्य असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

Allahabad High Court Murder Case
Supreme Court: संविधानाचे पालन करा नाहीतर भारत सोडा; सर्वोच्च न्यायालयाचा व्हॉट्सअप आणि मेटाला इशारा

हा निकाल न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठाने दिला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील आहे. सन 1982 मध्ये जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात माकू, सत्ती दीन आणि धनी राम या तिघांवर आरोप ठेवण्यात आले होते. घटनेनंतर माकू फरार झाला, तर दोन वर्षांनंतर म्हणजे 1984 मध्ये सत्र न्यायालयाने सत्ती दीन आणि धनी राम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

धनी राम याच वर्षी जामिनावर बाहेर आले होते. दरम्यान, सत्ती दीन यांची याचिका प्रलंबित असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात धनी राम हे एकमेव जिवंत याचिकाकर्ते होते.

उच्च न्यायालयाने निकाल देताना महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. विरोधी पक्ष आरोपीविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करू शकला नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे धनी राम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यांचा जामीन बाँडही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Allahabad High Court Murder Case
Ishan Kishan Video: 6,6,6,6,6,6,6... टी20 वर्ल्ड कपआधी ईशान किशनचा धमाका; फक्त 20 चेंडूत 53 धावा

न्यायालयाने असंही सांगितलं की गेल्या अनेक वर्षांत आरोपीने सहन केलेली चिंता, अनिश्चितता आणि सामाजिक परिणाम याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सुनावणीदरम्यान धनी राम यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की आरोपीचं वय जवळपास 100 वर्षे आहे आणि त्याने प्रत्यक्ष गोळीबार केला नव्हता. त्याच्यावर केवळ मुख्य आरोपीला चिथावणी दिल्याचा आरोप होता. थोडक्यात, 44 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेर 100 वर्षांच्या व्यक्तीला दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news