Indigo Flight Emergency landing : इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; गोवा विमानतळावर ‘इमर्जन्सी’ घोषित

इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
IndiGo
Indigo Flight Emergency landing : इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; गोवा विमानतळावर ‘इमर्जन्सी’ घोषितFile Photo
Published on
Updated on

indigo goa delhi flight returns back after mid air engine failure full emergency airport

पणजी : पुढारी ऑनलाईन इंडिगोच्या गोवा-दिल्ली विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमान गोवा विमानतळावरच परत आणण्यात आले आणि त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या बिघाडाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

IndiGo
jd vance : 'माझ्या पत्नीपासून दूर राहा...' उषा प्रकरणी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांचा उमेदवारावर जोरदार हल्लाबोल

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनमध्ये हवेतच बिघाड झाल्याने विमानाला पुन्हा गोवा विमानतळाकडे वळावे लागले. या घटनेनंतर विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित करण्यात आली. इंजिनमध्ये नेमका कोणत्या प्रकारचा बिघाड झाला आणि विमानातील प्रवासी व क्रू मेंबर्सची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 2102 या विमानाच्या एका इंजिनमध्ये हवेतच बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विमानाचे गोवा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एअर ट्रॅफिक कंट्रोलने ‘फुल इमर्जन्सी’ घोषित केली. हे विमान सकाळी 9:16 वाजता गोव्याहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते.

IndiGo
Rule Change Today : आजपासून देशात लागू झाले 'हे' ५ मोठे बदल... गॅस, दूधापासून कारपर्यंत महागाईचा चौफेर तडाखा..

एव्हिएशन ट्रॅकर ‘फ्लाइटरडार 24’च्या माहितीनुसार, हे विमान दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून गोव्याच्या दिशेने परत वळले. विमानतळाकडे परत येत असताना हे विमान सुमारे 14,000 फूट उंचीवर उड्डाण करत होते.

विमानाने गोव्याच्या दिशेने परतण्यास सुरुवात केल्यानंतर सकाळी सुमारे 9:30 वाजता एटीसीने विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ घोषित केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर गोव्यातील मोपा विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news