

Air Force Proposal Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका हवाई दलाच्या अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीला अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओने अनेक नेटिझन्सची मने जिंकली आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भारतीय वायुसेनेच्या गणवेशातील एक अधिकारी आपल्या प्रेयसीसमोर वेगळ्याच शैलीत प्रपोज करताना दिसत आहे. तो आपल्या प्रेयसीभोवती पुश-अप्स करत प्रपोज करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण प्रसंग त्याच्या सहकाऱ्यांसमोर घडत असून ते त्याला उत्साहाने प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये हा अधिकारी आपल्या खिशातून अंगठी काढतो आणि गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीला लग्नासाठी विचारतो. हा क्षण पाहून उपस्थित सहकारी जोरदार टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करतात. काही क्षणांच्या भावनिक वातावरणानंतर त्या तरुणीनेही हसतच “हो” म्हणत प्रपोजल स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यानंतर अधिकाऱ्याने तिच्या बोटात अंगठी घातली आणि दोघेही आनंदाने हसताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्याचे सहकारीही आनंदाने उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या जल्लोषामुळे हा क्षण आणखी खास बनला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अनेक नेटिझन्सनी या प्रस्तावाला “ड्रीम प्रपोजल” असे म्हणले आहे. काहींनी या तरुणीला खूप भाग्यवान असल्याचे म्हणले आहे. “खूप सुंदर आणि भावनिक क्षण,” “खूपच छान प्रस्ताव,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
प्रेम व्यक्त करण्याच्या या अनोख्या शैलीमुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणणारा आहे. या भावनिक क्षणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रेम आणि नात्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.