Viral Video: पंतप्रधान मोदी महिलांना फ्री स्कूटी देणार.., व्हिडिओ पाहिलाय का? योजनेचं सत्य आलं समोर

PIB fact check viral video: पंतप्रधानांचा 'मोफत स्कूटी' देणारा व्हिडिओ पीआयबी फॅक्ट चेकने केला मोठा खुलासा. सरकारी योजनांची खात्री करण्यासाठी वापरा 'ही' अधिकृत वेबसाईट.
PIB fact check viral video
PIB fact check viral videofile photo
Published on
Updated on

PIB fact check viral video

नवी दिल्ली: सध्या AI (Artificial Intelligence) द्वारे बनवलेले व्हिडिओ ओळखणे अत्यंत कठीण झाले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात, जे दिसायला अगदी खरे वाटतात. अलीकडेच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी महिलांना मोफत स्कूटी देण्याबद्दल बोलताना दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ खरा नसून AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. PIB Fact Check ने 'X' वर या व्हिडिओचे सत्य उघड केले आहे आणि सरकारी योजनांची माहिती नेहमी myscheme.gov.in या अधिकृत वेबसाइटवरच पाहण्याचे आवाहन केले आहे.

PIB fact check viral video
सेवा तीर्थ स्थलांतरानंतर महत्त्वाचे निर्णय; पंतप्रधान राहत योजना, लखपती दीदी फाईलवर मोदींनी केली सही

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषतः इंस्टाग्रामवर एका युजरने पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान असे म्हणताना दिसतात की, "ज्या महिलांचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना केंद्र सरकार आधार कार्डवर मोफत स्कूटी देणार आहे." हा व्हिडिओ एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून इतक्या हुबेहूब पद्धतीने बनवण्यात आला आहे की, तो पाहताना सर्वसामान्यांना तो खराच वाटतो.

पीआयबी फॅक्ट चेकचा खुलासा

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकने याची दखल घेतली. आपल्या अधिकृत 'X' खात्यावरून माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हिडिओ एआय-जनरेटेड असून तो बनावट आहे. केंद्र सरकार सध्या अशी कोणतीही योजना राबवत नाही." 'rounakkumartalks' नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ पहिल्यांदा प्रसारित करण्यात आला होता.

अधिकृत माहिती कुठे मिळेल?

ट्वीटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, हा व्हिडिओ पूर्णपणे AI निर्मित आहे. केंद्र सरकारकडून सध्या अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. लोककल्याणकारी योजनांशी संबंधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी नेहमी myscheme.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

PIB fact check viral video
India USA trade deal | करारामुळे भारताचा अमेरिकेशी ट्रेड सरप्लस 90 अब्ज डॉलर्सहून अधिक होण्याची शक्यता

काय आहे 'myScheme' पोर्टल?

भारत सरकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म myScheme लोकांना योग्य सरकारी योजना शोधण्यात मदत करते. याद्वारे नागरिक केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतात. हे पोर्टल तुमच्या वय, लिंग, उत्पन्न, व्यवसाय आणि राज्याच्या आधारावर तुम्हाला लागू होणाऱ्या योजनांची माहिती देते. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जाऊन माहिती शोधण्याची गरज पडत नाही. तुमची पात्रता, प्रवर्ग आणि वयानुसार तुम्ही सरकारी योजनांची अचूक माहिती येथे मिळवू शकता.

PIB fact check viral video
PM Kisan Yojana: महाराष्ट्रातील १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा २२ वा हप्ता मिळणार नाही; मंत्रालयाने सांगितली गंभीर चूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news