QR code scam: रजनीकांतचा चित्रपट पाहून सुचली आयडिया; AI ने थेट QR कोडच बदलला! १९ वर्षीय मुलाला अटक; पाहा नेमकं काय केलं?

रजनीकांत यांचा प्रसिद्ध चित्रपट 'वेय्टैयन' मधील सीन पाहून एका १९ वर्षीय तरुणाने दिल्लीतील एका कापड दुकानदाराला १.४ लाख रुपयांचा गंडा घातला.
QR code scam
QR code scamfile photo
Published on
Updated on

QR code scam

नवी दिल्ली : रजनीकांत यांचा प्रसिद्ध चित्रपट 'वेय्टैयन' (Vettaiyan) मधील सीन पाहून एका १९ वर्षीय तरुणाने दिल्लीतील एका कापड दुकानदाराला १.४ लाख रुपयांचा गंडा घातला. QR कोडमध्ये फेरफार करून पैसे चोरल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातून मनीष वर्मा (वय १९) याला अटक केली आहे.

QR code scam
Aadhaar Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर चुकलाय की बंद झालाय? आता घरातून ५ मिनिटांत करा अपडेट; सर्वात सोपी पद्धत

ही घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आली. दिल्लीतील एका कपड्याच्या दुकानात एका ग्राहकाने २.५ लाख रुपयांचा लेहंगा खरेदी केला होता. त्याने UPI द्वारे ९०,००० आणि ५०,००० रुपयांचे दोन व्यवहार केले. मात्र, हे पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा झाले नाहीत. अशा प्रकारे एकूण १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली.

दुकानदाराने तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला. तपासात आणि आर्थिक व्यवहारांच्या माहितीवरून असे समोर आले की, QR कोडमध्ये छेडछाड करण्यात आली होती. आरोपीने दुकानातील खरा मर्चंट QR कोड चोरून AI-आधारित इमेज एडिटिंग ॲप्सच्या मदतीने त्यातील बँक डिटेल्स बदलले होते. म्हणजेच, त्याने त्या फोटोवर स्वतःचा QR कोड लावला, पण बाहेरून तो दिसायला हुबेहूब मूळ कोडसारखाच ठेवला जेणेकरून ग्राहकाला संशय येऊ नये. ग्राहकाने तो स्कॅन करताच पैसे थेट मनीषच्या खात्यात जमा झाले.

रजनीकांतच्या चित्रपटातून सुचली युक्ती

दिल्ली पोलिसांनी मनीषला चाकसू येथून अटक केली. त्याच्याकडून १०० हून अधिक एडिट केलेले QR कोड, मोबाईल फोन, चॅट्स, स्क्रीनशॉट आणि आर्थिक नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, फसवणूक करण्याची ही कल्पना त्याला रजनीकांत यांच्या ‘वेय्टैयन’ चित्रपटातील काही दृश्यांवरून सुचली होती. चित्रपटात दाखवलेली पद्धत त्याने प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्याचा प्रयत्न केला.

QR code scam
Smartphone ban: तरुण मुली आणि सुनांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी! १५ गावांचा अजब निर्णय; काय आहे त्यामागचे कारण?

घरात सापडले १०० हून अधिक बनावट कोड

उत्तर दिल्लीचे DCP राजा बांठिया यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "एकूण १.४० लाख रुपयांचे दोन व्यवहार झाले होते, परंतु दुकानदाराला एकही रुपया मिळाला नव्हता. सायबर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. फसवणुकीचे खाते ट्रेस केले आणि राजस्थानमधून आरोपीला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत १०० हून अधिक छेडछाड केलेले QR कोड सापडले. तो ऑनलाइन दुकानदारांशी संपर्क साधून वस्तू खरेदी करणार असल्याचे सांगायचा आणि पेमेंटसाठी त्यांचा QR कोड मागायचा. त्यानंतर AI सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या कोडमध्ये बदल करून तो पुन्हा दुकानदाराला WhatsApp वर पाठवायचा."

अनेक प्रकरणांमध्ये, बदल केलेले क्यूआर कोड विक्रेत्यांच्या फोन गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह होत असत, ज्यात व्यापाऱ्याचे नाव बदललेले असे, तर क्यूआर कोडची रचना तशीच राहत असे. जेव्हा ग्राहक नंतर या सेव्ह केलेल्या क्यूआर कोडचा वापर करून पेमेंट करत असत, तेव्हा पैसे योग्य व्यापाऱ्याऐवजी आरोपीच्या खात्यात जात असत. या प्रकरणात आणखी पीडित असण्याची शक्यता पोलिसांना आहे. जप्त केलेले साहित्य तसेच आरोपीचा मोबाइल फोन आणि डिजिटल डेटाच्या आधारे तपास सुरू असल्याचे डीसीपी बांथिया यांनी सांगितले.

QR code scam
Rabies Death: धक्कादायक! कुत्रा चावल्याच्या २ वर्षांनंतर तरुणाचा रेबीजने मृत्यू; विचित्र लक्षणे पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news