Smartphone ban: तरुण मुली आणि सुनांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी! १५ गावांचा अजब निर्णय; काय आहे त्यामागचे कारण?

एकीकडे देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असताना १५ गावांमध्ये सुना आणि तरुण मुलींना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली आहे. काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या.
Smartphone ban
Smartphone banfile photo
Published on
Updated on

women smartphone ban

जालोर : एकीकडे देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असताना, राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. १५ गावांमध्ये सुना आणि तरुण मुलींना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली असून त्यांना केवळ कीपॅड फोन वापरण्याचा आदेश दिला आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Smartphone ban
Jaya Bachchan: "जया बच्चन स्वतः १५० रुपयांची साडी नेसतात आणि..."; हिंदुस्थानी भाऊ भडकला

सार्वजनिक कार्यक्रमातही बंदी

गाजीपूर गावात आयोजित चौधरी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ पट्टी उपविभागाचे अध्यक्ष सुजनाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत १५ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नव्या नियमानुसार, महिलांना केवळ साधे कीपॅड फोन वापरता येतील. विशेष म्हणजे, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी जातानाही स्मार्टफोन नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

शालेय मुलींना काही प्रमाणात सवलत

पंचायतीने स्पष्ट केले आहे की, शाळेत जाणाऱ्या मुली अभ्यासासाठी घरात मोबाईल वापरू शकतात. मात्र, त्यांनाही लग्नकार्य, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी मोबाईल नेण्याची परवानगी नसेल. समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पंच सदस्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे पंच हिंमताराम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

निर्णय का घेतला? पंचायतीने दिले स्पष्टीकरण

पंचायतीच्या या निर्णयावर टीका होत असताना, पंचायतीने मात्र याचे समर्थन केले आहे. सुजनाराम चौधरी यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. "घरातील महिला स्मार्टफोन वापरत असताना मुलेही त्याकडे आकर्षित होतात. अनेकदा महिला आपली कामे करण्यासाठी मुलांच्या हातात फोन देतात, ज्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहे. मुलांचे आरोग्य आणि संस्कार जपण्यासाठीच हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे."

Smartphone ban
Rabies Death: धक्कादायक! कुत्रा चावल्याच्या २ वर्षांनंतर तरुणाचा रेबीजने मृत्यू; विचित्र लक्षणे पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news