Ahmedabad Plane Crash |अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात २४२ जण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी याच विमानातून करत होते प्रवास

एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना
Ahmedabad Plane Crash
अहमदाबाद विमान दुर्घटना.
Published on
Updated on

Ahmedabad Plane Crash

अहमदाबाद (गुजरात) : अहमदाबादजवळील मेघानी भागात गुरुवारी (दि. १२) एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान मेघानी भागात क्रॅश झाले. ते लंडनला जात होते. या विमानातून २४२ लोक प्रवास करत होते. त्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. या अपघातग्रस्त विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ज्या ठिकाणी हे विमान कोसळले आहे तेथे धुराचे लोट दिसून आले आहेत. हे विमान एअर इंडिया १७१ (Flight AI171) या नावाने आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash: विमान काेसळतानाचे दृश्‍य कॅमेर्‍यात कैद, थरकाप उडविणारे Video

विमानात होते एकूण २४२ जण

"अहमदाबादहून गॅटविक (लंडन) कडे जाणारे एअर इंडियाचे बी ७८७ व्हीटी-एएनबी फ्लाईट एआय-१७१ (flight AI-171) विमान उड्डाण केल्यानंतर लगेचच अहमदाबादजवळ कोसळले. या अपघातग्रस्त विमानात २४२ लोक होते. त्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू मेंबर्सचा समावेश होता. या विमानाचे नेतृत्त्व कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर करत होते," अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash: विमानात किती भारतीय प्रवासी होते? एअर इंडियाची पहिली प्रतिक्रिया, हेल्पलाईन क्रमांकही जारी

पीएम मोदींची अमित शहा यांच्याशी चर्चा

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांना अहमदाबादला घटनास्थळी जाऊन सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळी तात्काळ बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि जखमी प्रवाशांवर युद्धपातळीवर उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ पथक बचावकार्य करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news