

Ahmedabad Plane Crash Viral Video:
अहमदाबाद : अहमदाबादमधील विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान आज ( दि. १२ जून ) दुपारी कोसळले. काळजाचा थरकाप उडविणार्या या भीषण अपघाताची दृश्य कॅमेर्यात कैद झाली असून, व्हायरल व्हिडिओमध्ये विमान वेगाने खाली येत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, विमान कोसळल्यानंतर परिसराला धुराच्या लाेटाने व्यापल्याचे दिसत आहे.
संपूर्ण परिसरात धुराचे लोट....
एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-171 दुपारी १.३८ वाजता उड्डाण केले. गुजरातमधील अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात दुपारी १.४० वाजता विमान विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ कोसळले.
व्हायरल व्हिडिओमध्ये विमान वेगाने खाली येत दिसत आहे. विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे लोट दिसत आहेत.
उड्डाणानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये विमान कोसळले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घटनास्थळावर स्थानिक पोलिसांचे पथक अवघ्या काही मिनिटांमध्येच पोहोचल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून स्थानिकांनी व प्रवाशांच्या नातेवाईकांनी परिसरात गर्दी करू नये. गर्दीमुळे जखमींना रुग्णालयात नेताना अडथळे येत आहेत, तसेच अग्निशमन दलाच्या बंबांनाही घटनास्थळी पोहोचता येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विमान निवासी भागात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात २४२ प्रवासी होते.
विमानात 242 जण होते. यातील 169 जण हे भारतीय तर 53 प्रवासी हे ब्रिटिश नागरिक होते. 7 जण पोर्तुगीज आणि एक जण कॅनडाचे नागरिक असल्याचे एअर इंडियाने पत्रकात म्हटले आहे. प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी 1800 5691 444 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.