Fake Death Certificate: मृत व्यक्ती १२ वर्षानंतर स्कूटी चालवताना दिसला... पोलीस पोहचले घरात, मोठ्या कायदेशीर कचाट्यात अडकला

Fake Death Certificate
Fake Death Certificatepudhari photo
Published on
Updated on

Fake Death Certificate: उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका आरोपीने कायदेशीर कचट्यातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी स्वतःला मृत घोषित केलं होतं. त्यानं खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे आपल्याविरूद्ध सुरू असलेला खटला बंद करून घेतला होता. मात्र तब्बल १२ वर्षांनी काळाची चक्रे फिरली अन् या आरोपीला आता पुन्हा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली.

Fake Death Certificate
Raigad Crime | पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक, कॅम्पमधील गोंधळ असह्य झाल्याने केले कृत्य

आग्र्यात नेमकं काय झालं?

आग्रा मधील आऱोपी तारा चंद्र शर्मा यांच्याविरूद्ध खोट्या कागदपत्रांचे एक प्रकरण सुरू होतं. या प्रकरणात त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट देखील जारी झालं होतं. अटक टाळण्यासाठी या आरोपीने २०१३ मध्ये नगरपालिकेतून खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ते कोर्टात सादर केलं होतं. या प्रमाणपत्रात या व्यक्तीला १९९८ मध्येच मृत घोषित करण्यात आलं होतं.

या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली. त्या आधारे कोर्टाने आरोपीविरूद्ध सुरू असलेली कारवाई बंद केली. मात्र हा व्यक्ती या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या जोरावर तब्बल १२ वर्षे कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून सामान्य आयुष्य जगत होता.

Fake Death Certificate
Justice N Kotiswar Singh | कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी कायद्याचा गैरवापर धोकादायक; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे मत

काळाची चक्रे फिरली

मात्र काळाची चक्रे फिरली अन् शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली. नोव्हेंबर २०२५ मध्ये ज्यांनी शर्मांविरूद्ध तक्रार दाखल केली होती त्या राजकुमार वर्मांना हे तारा चंद्र शर्मा गांधी नगर परिसरात स्कूटी चालवताना दिसले. त्यांनी लगेचच आरोपीचा फोटो काढला, स्कूटीचा नंबर मिळवून त्या आधारे आरटीओ कार्यालयातून माहिती मिळवली.

तपासात असं मोर आलं की आऱोपीने २०१६ मध्ये आपल्या नावावर नवीन स्कूटी घेतली होती. त्यांनी आपलं खरं नाव बँक खाते आणि मोबाईल बँकिंगसाठी देखील वापरलं होतं. हे पुरावे हाती लागल्यानंतर तक्रारदार वर्मा यांनी कोर्टात पुन्हा याचिका दाखल केली.

Fake Death Certificate
Ratnagiri Crime : रत्नागिरीत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

तपासाचे आदेश

कोर्टाने देखील आग्रा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांना तपासादरम्यान, आरोपी आपल्या घरी जीवंत आढलला. पोलिसांनी त्यांच्या घरातून त्याचे आणि मुलाचे फोटो देखील ताब्यात घेतलं. हे फोटो पुरावा म्हणून कोर्टात सादर केले गेले.

तपास अहवालात आरोपीच्या मुलाने त्याचे वडील जिवंत असून वय जास्त असल्यानं ते घरीच असतात. कधी कधी ते स्कूटीवरून बाहेर जातात असं मान्य केलं. पोलिसांनी तपासाचा अहवाल कोर्टात सादर केला असून आता पुढची कायदेशीर करावाई करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news