Ratnagiri Crime : रत्नागिरीत प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षण क्षेत्रात खळबळ
Rape Case
हुबळीत एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार(File Photo)
Published on
Updated on

रत्नागिरी : शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून 2021 ते 2026 या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

दिलीप ज्ञानेश्वर जाधव (वय 45, मूळ रा. सावर्डे, चिपळूण, सध्या रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. पीडिता इयत्ता दहावीत असतानाच त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर पीडिता अकरावीसाठी संबंधित महाविद्यालयात शिक्षण घेऊ लागल्यानंतर संशयित प्राध्यापकाने तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, संबंधित प्राध्यापकाने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी संशयित प्राध्यापकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 64(1), 64(2)(फ), 69, 351 तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई करत आहेत. या घटनेमुळे समाजात आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षकांकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील दुसरी घटना

शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या बाबतीत घडलेली ही दुसरी गंभीर घटना आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये शहरातील एका नामवंत शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीशी प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या घटनेनंतरही अशी पुनरावृत्ती होणे हे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news