Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा

विदेशी बँकांकडे प्रस्‍ताव
Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुपने दोन सिमेंट कंपन्यांच्या खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी जागतिक बँकांकडून २.५ अब्ज (२३,७८२ कोटींहून अधिक भारतीय रुपये) डॉलर्स उभारण्याची योजना तयार केली आहे. हे या वर्षातील भारतातील सर्वात मोठे विदेशी कर्ज असेल. ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात सूत्रांनी हा दावा केला आहे.

अदानी कुटुंबाची मॉरिशसआधारित कंपनी ‘एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ एका ‘ब्रिज लोन’द्वारे १.५ अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आखत आहे. या कर्जाचा कालावधी १८ ते २४ महिन्यांचा असेल. खासगी माहितीवर चर्चा होत असल्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकांनी ही माहिती दिली.

Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा
Red Fort Blast Case : YouTube, ChatGPT वरून रॉकेटचे धडे अन् कार बॉम्बचा वापर; लाल किल्ला हल्ल्याबाबत NIA चे मोठे खुलासे

असा आहे ‘अदानीं’चा प्लॅन

सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी विदेशातून घेत असलेल्‍या सुरुवातीच्‍या कर्जावर अमेरिकेच्या मानक दरापेक्षा (एसओएफआर) १.५ टक्‍के जास्त व्याज लागेल. तथापि, ही तात्पुरती व्यवस्था (ब्रिज लोन) आहे. काही काळानंतर, कंपनी हे विदेशी कर्ज फेडण्‍यासाठी स्‍टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि एचडीएफसी बँकेकडून रुपयांत नवीन कर्ज घेईल.

Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा
8th Pay Commission : पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! ४० वर्षांचे जुने आर्थिक गणित बदलण्याची शक्यता

याशिवाय, समूहाची दुसरी कौटुंबिक मालकीची कंपनी ‘अदानी इन्फ्रा (इंडिया) लिमिटेड’, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग’ (ईसीबी) खिडकीचा वापर करून पाच वर्षांच्या कर्जाच्या माध्यमातून सुमारे १ अब्ज डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनुसार, ही सुविधा ‘एसओएफआर’पेक्षा सुमारे २७५ बेसिस पॉईंटस्‌ अधिक दराने उपलब्ध होऊ शकते.

Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा
Punjabi Singer Gunfire : कॅनडात पंजाबी गायक विर्कच्या ताफ्यावर गोळीबार; दुर्घटना टळली

‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार, हा व्यवहार पूर्ण झाल्‍यास हे या वर्षातील भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे परदेशी कर्ज ठरेल. ही रक्‍कम अदानी कॉनेक्स प्रा. लि.च्या १.१३ अब्ज डॉलर्सच्या कर्जापेक्षाही मोठी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news