Punjabi Singer Gunfire : कॅनडात पंजाबी गायक विर्कच्या ताफ्यावर गोळीबार; दुर्घटना टळली

Ammy Virk : विर्क थोडक्यात बचावला
Punjabi Singer Gunfire canada
Published on
Updated on

ओटावा : कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात पंजाबी गायक आणि अभिनेता ॲमी विर्कच्या ताफ्यातील एका वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अबोटस्‌फोर्ड शहरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसून विर्क थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे.

ॲमी विर्कचा ‘रॉजर्स फोरम’ येथे संगीत कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मॅककॅलम रोडवरील २,५००-ब्लॉक परिसरातून त्याचा ताफा जात होता. त्यावेळी एका संशयित एसयूव्हीमधून ताफ्यातील रोल्स-रॉईस कुलीनन गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

Punjabi Singer Gunfire canada
UN map Arunachal Pradesh : संयुक्त राष्‍ट्रांच्‍या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनबाबत खोडसाळपणा

मिळालेल्या माहितीनुसार, वाहनावर तब्बल सात गोळ्या झाडण्यात आल्या. वाहन बुलेटप्रूफ असल्याने वाहनातील प्रवासी सुरक्षित राहिले. गाडीच्या मागील भागाचे गोळ्या लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वाहनात ॲमी विर्क आणि कार्यक्रमाचा आयोजक उपस्थित असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

कॅनडामध्ये गेल्या काही वर्षांत पंजाबी कलाकारांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. याआधी २०२३ मध्ये गायक गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर झालेला गोळीबार चर्चेत आला होता. विर्क हा ‘किस्मत’, ‘अंग्रेज’ आणि ‘लौंग लाची’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे जगभरात ओळखला जातो.

Punjabi Singer Gunfire canada
Uber चा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! ३,३०० जणांच्या नोकऱ्या गेल्या; आता उर्वरित २९ हजार कर्मचाऱ्यांसाठीही घेतला महत्वाचा निर्णय

पोलिसांची भूमिका आणि तपास

अबोटस्‌फोर्ड पोलिस दलाच्या ‘मेजर क्राईम युनिट’ने या घटनेचा तपास हाती घेतला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा एका विशिष्ट हेतूने केलेला पूर्वनियोजित हल्ला असल्याचे दिसते.

सार्जंट पॉल वॉकर यांनी सांगितले की, गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव वाहनातील व्यक्तींची नावे अधिकृतरीत्या जाहीर करता येणार नाहीत. दरम्यान, घटनास्थळापासून ५ कि.मी. अंतरावर एका पेटलेल्या एसयूव्हीची माहिती पोलिसांना मिळाली असून या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध आहे का, याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news