Adani Group : विमानतळांनंतर अदानी समूह आता करणार विमान वाहतूक क्षेत्रात एन्ट्री! गुंतवणुकीसाठी सरकारकडे प्रस्ताव

Adani Group aviation sector investment : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतून अधिक भांडवल उभारण्याचाही प्रयत्न करत
Adani Group aviation sector investment
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari Photo
Published on: 
Updated on: 

Adani Group aviation sector investment : देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असणार्‍या अदानी समूह विमान वाहतूक क्षेत्रात, विमानतळांच्या पलीकडे जाऊन, आपला विस्तार करू इच्छित आहे. यासाठी सरकारी मंजुरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती से समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर (‘रॉबी’) सिंग यांनी शुक्रवारी (दि.२८) सांगितले. समूह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतून अधिक भांडवल उभारण्याचाही प्रयत्न करत असल्‍याचे सिंग यांनी स्‍पष्‍ट केले.

देशात ६० कोटींहून अधिक लोकांकडे विमान प्रवासाची क्षमता

'ट्रस्ट इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिट 2026' मध्‍ये बोलताना सिंग म्‍हणाले की, "देशात विमान प्रवाशांची मोठी क्षमता आहे. मात्र त्‍या तुलनेत विमान कंपन्‍यांची संख्‍या त्रोटक आहे. भारतात ६० कोटीहून अधिक लोकांकडे विमान प्रवासाची क्षमता आहे. यासाठी देशातील दररोज विमान उड्डाणांची संख्या दहा पटीने वाढवून म्‍हणजेच ३० हजारांपर्यंत नेण्याची गरज आहे. देशातील दैनंदिन लोकांचे वाढते उत्‍पन्‍न पाहता विमान वाहतूक क्षेत्रात विकासाची मोठी संधी आहे. त्‍यामुळेच आम्‍ही सरकारला सरकारकडे गुंतवणुकीची परवानगी मागितली आहे. निधी उपलब्‍ध करणे , इतर विमान कंपनी किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना पाठबळ देऊन आम्ही विमान कंपन्यांच्या विकासामध्‍ये योगदान देण्‍याचा आमचा मानस आहे."

Adani Group aviation sector investment
Adani Group foreign loan : अबब! २,३७,८२,५०,२३,५०० रुपयांचे विदेशी कर्ज घेणार अदानी ग्रुप : ‘ब्लूमबर्ग’चा दावा

निधी उभारणीसह गुंतवणुकीचे नियोजन

देशातंर्गत विमान वाहतूक विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांत अदानी समूहातील कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून दरवर्षी १.३ ते १.४ लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारणार आहेत. 'अदानी पॉवर' देशांतर्गत बाजारात आघाडीवर असेल, तर इतर कंपन्या आंतरराष्ट्रीय रोखे बाजारातून निधी उभारतील, असेही सिंग यांनी स्‍पष्‍ट केले.

Adani Group aviation sector investment
Gautam Adani news: गौतम अदानींवर खटला चालण्याची शक्यता धूसर

दरवर्षी ४.५ ते ५ लाख कोटी रुपये गुंतवण्याची समूहाची क्षमता

समूहाचा वार्षिक भांडवली खर्च तीन वर्षांपूर्वीच्या ८० हजार कोटी रुपयांवरून अनुक्रमे १.१ लाख कोटी आणि १.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिकदृष्ट्या दरवर्षी ४.५ ते ५ लाख कोटी रुपये गुंतवण्याची समूहाची क्षमता आहे. मात्र, पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे प्रत्यक्ष जमिनीवर दरवर्षी सुमारे २ लाख कोटी रुपयांचीच कामे पूर्ण करता येतात, असा खुलासाही त्‍यांनी केला. तसेच पुढील पाच वर्षांत समूहाच्या कार्यचालन नफ्यात (Ebitda) तिप्पट वाढ होईल, असा विश्वास सिंग यांनी व्यक्त केला.

Adani Group aviation sector investment
LIC investment Adani Group : एलआयसीचा हजारो कोटींचा निधी अदानी समूहात

देशांतर्गत भांडवली बाजार ७५ टक्‍क्‍यांपर्यंत नेण्‍याचे उद्दिष्ट

सध्या समूहाच्या एकूण भांडवलात देशांतर्गत बाजाराचा वाटा ५६ टक्के असून, तो टप्प्याटप्प्याने ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. समभाग विक्रीतून दरवर्षी ३ ते ४ अब्ज डॉलर उभारले जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत २५ ते ३० अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर समूहाच्या निव्वळ कर्जात केवळ २५ अब्ज डॉलरची भर पडेल. समूहाचे पतमानांकन (क्रेडिट रेटिंग) सुधारून आता 'AA+' इतके भक्कम झाले आहे, असेही सिंग यांनी नमुद केले.

डेटा सेंटर्समध्ये १० अब्ज डॉलरची गुंतवणूक

डेटा सेंटर्स हे समूहासाठी गुंतवणुकीचे नवे आणि मोठे क्षेत्र ठरत आहे. सध्याच्या ३ अब्ज डॉलरच्या वित्तपुरवठा करारातून समूहाने ९०० दशलक्ष डॉलरचा निधी उचलला असून, पुढील चार वर्षांत या क्षेत्रातील एकूण करार १० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचतील. यासोबतच धातू (मेटल्स) आणि मटेरिअल क्षेत्रातील संधींचाही समूह शोध घेत असल्‍याचेही सिंग म्‍हणाले.

Adani Group aviation sector investment
Gautam Adani US Court : गौतम अदानी यांना अमेरिकन न्यायालयाचा दिलासा; लाचखोरी, फसवणुकीचे फौजदारी खटले कायमचे रद्द

पुढील वर्षी 'अदानी एअरपोर्ट्स' स्वतंत्र कंपनी होणार?

विमानतळ व्यवसायाच्या विस्ताराबाबत सिंग म्‍हणाले " पुढील वर्षी म्‍हणजे २०२७ मध्‍ये 'अदानी एअरपोर्ट्स' स्वतंत्र कंपनी म्हणून वेगळी होण्यासाठी पूर्णपणे सज्ज असेल. अर्थात, याबाबतचा अंतिम निर्णय संचालक मंडळ घेईल. यासाठी थेट आयपीओ (IPO) आणण्याऐवजी 'डिमर्जर'चा मार्ग निवडला जाईल, असेही सिणंग यांनी सांगितले.

अदानी समुहाने उभारलेल्‍या विमानतळांची संख्या आठवर

सहा विमानतळांचे कंत्राट मिळाल्यानंतर २०१९ मध्ये 'अदानी एंटरप्रायझेस'ची उपकंपनी म्हणून 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज'ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सूत्रे हाती घेतली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समावेशामुळे समूहाने उभारलेल्‍या विमानतळांची संख्या आता आठवर पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.