Abhijeet Dipke Join Politics: राजकारणात उतरणार, कोणत्या पक्षात जाणार...? अभिजीत दिपकेने भविष्याबाबत केलं मोठं विधान

Abhijeet Dipke Join Politics
Abhijeet Dipke Join Politicspudhari
Published on
Updated on

Abhijeet Dipke Join Politics: कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावरील एका गंमतीत सुरू झालेल्या पक्षाने कधीही न झुकणाऱ्या सरकारला झुकवून त्यांना त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा देण्यास भाग पाडलं. त्यानंतर आता अभिजीत दिपके, कॉक्रोज, जेन झी यांना अख्खा देश गांभिर्याने घेऊ लागला आहे.

Abhijeet Dipke Join Politics
Abhijeet Dipke : भाजप प्रवेशाची ऑफर, आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव

अभिजीत दिपकेपासून चार हात लांब असणारी माध्यमे देखील आता अभिजीतची बाईट घेण्यासाठी सरसावत आहेत. अभिजीतने नुकतेच एका वृत्तसमुहाला एक मुलाखत दिली होती. त्यात अभिजीतला त्याच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिजीतने खुलेपणाने आपलं फ्युचर प्लॅनिंग सांगितलं.

Abhijeet Dipke Join Politics
Abhijeet Dipke: 'देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा अधिक...'; PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओवर अभिजीत दिपकेंची उपरोधिक टीका

अभिजीत दिपकेला तुझं पुढचं प्लॅनिंग काय... तू राजकीय पक्ष काढणार का अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी अभिजीतने उत्तर दिलं की, या आंदोलनात मला एक समजलं की राजकीय नेते जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. लोकांची सर्वात मोठी तक्रार ही त्यांचे म्हणणे कुठं ऐकून घेतलं जात नाही ही आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा या लोकांपर्यंत पोहचून त्यांना नेमकं काय पाहिजे आहे हे जाणून घ्यायचं आहे.

अभिजीत पुढे म्हणाला की, सध्या तीन मुद्दे प्रमुख आहेत. शिक्षण जे संपूर्ण देशाला प्रभावित करत आहे. बेरोजगारी जे आंदोलनात असलेल्या मोठ्या वयाच्या लोकांची समस्या आहे. तीसरी म्हणजे देशाच्या संस्था आणि व्यवस्था यांच्यावरचा लोकांचा उडत चाललेला विश्वास.

Abhijeet Dipke Join Politics
Abhijeet Dipke|.....तर गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : अभिजित दिपके, पोलिसांनी दगडांनी भरलेला ट्रक आणल्याचाही आरोप!

अभिजीतने राजकारणााबबत खुलेपणाने भाष्य केलं. तो म्हणाला की, आम्ही कोणताही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. हा एक रिस्पोन्स ग्रुप आहे. हा ग्रुप पुढच्या निवडणुकीपर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करणार आहे. आम्ही जनतेचा युवकांचा आवाज उठवणार आहोत.

अभिजीत दिपकेला आता तुमच्या घरी राजकीय व्यक्तींचे येणे जाणे वाढले आहे. कोणत्या पक्षाने ऑफर वगैरे काही दिलं आहे का असं विचारण्यात आलं. त्यावेळी अभिजीतने नाही असं उत्तर देत कोणीही पार्टी जॉईन करण्यास सांगितलेलं नाही. ते फक्त शुभेच्छा देण्यासाठी आणि आम्ही चांगलं काम करून विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी येत आहेत. असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news