Abhijeet Dipke Ink Attack: 'निळा माझा आवडता रंग', महिलेने अभिजीत दीपकेवर फेकली शाई; आंदोलकांनी पकडलं, जंतर-मंतरवर गोंधळ

Abhijeet Dipke Ink Attack: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केली, त्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
Abhijeet Dipke Ink Attack
Abhijeet Dipke Ink AttackPudhari
Published on
Updated on

Abhijeet Dipke Ink Attack: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

शाईफेकीच्या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना, "निळा हा माझा आवडता रंग आहे," असे लिहिले. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

उपोषणाची घोषणा

या घटनेपूर्वी अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की, "सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आंदोलन कमकुवत होईल, असे प्रशासनाला वाटत असेल; मात्र आता त्यांच्या जागी मी उपोषणाला बसणार आहे."

Abhijeet Dipke Ink Attack
RBI Penalty on NBFC: RBIची मोठी कारवाई! मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा मुद्दाही उपस्थित

दीपके यांनी पुढे आरोप केला की, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्या आरोग्याचा दाखला देत त्यांना ताब्यात घेतले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केवळ प्रकृती गंभीर असल्यासच रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्देश दिले होते, असे त्यांनी सांगितले.

Abhijeet Dipke Ink Attack
Abhijeet Dipke: 'आता नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणार'; वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक

त्यांच्या मते, सोनम वांगचुक यांनी स्वतःची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते आणि उपलब्ध वैद्यकीय अहवालातही त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले होते.

पोलीस तपास सुरू

दरम्यान, शाईफेक करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत अधिकृत तपास सुरू असून, पुढील माहिती पोलिसांच्या तपासानंतरच मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news