धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून गँगरेप, पीडिता गर्भवती

हैदराबादमधील घटना
Hyderabad crime
हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून गँगरेप.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

हैदराबादमधील एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचे पुरुषांच्या एका गटाने अपहरण केले आणि तिला अंमली पदार्थ असलेले ड्रिंक्स पिण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

चालक चक्कोलू नरेश (२६), कामगार सिरिपांगा विजय कुमार (२३), मजूर वागमारे बालाजी (२३), गुडंती कृष्णा (२२), टिफीन सेंटर कामगार थोंटे किरण कुमार (२६), डिलिव्हरी बॉय बोल्लेपोगू अजय (२३), वॉटर कॅन सप्लायर जेम्स झेवियर (२४), कामगार वागमारे दीपक (२५), हाऊस क्लिनर सबावथ हाथ्या नाईक (२५) आणि इंजामूरी मधू (३०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Hyderabad crime
Crime News | पनवेलच्या तरुणीने जीवन संपविले, नाशिकच्या प्रियकराला अटक

आधी मैत्री केली अन् मग गँगरेप

नरेश आणि विजय कुमार यांनी २५ जून रोजी शहरातून पीडित मुलीचे अपहरण केले होते. त्यांनी एका सामान्य मित्राप्रमाणे तिच्याशी मैत्री केली. त्यांनी इतरांना या गुन्ह्यात सहभागी करून घेतले आणि अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार आणि तिला अंमली पदार्थ घातलेले ड्रिंक्सही पिण्यास भाग पाडले.

Hyderabad crime
Nashik Crime | युवतीस बळजबरीने रिक्षात बसवून दमदाटी, जीवे मारण्याची धमकी

पीडित मुलगी गर्भवती

त्यानंतर, या अत्याचारामुळे सदर पीडित मुलगी गर्भवती राहिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मोबाईल फोन, वाहनांसह स्कूटर, मोटारसायकल, सिमकार्ड्स जप्त केली आहेत. २९ जून रोजी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा गुन्हेगारी कारवाया आणि अंमली पदार्थ सेवनामध्ये सहभाग आहे. सर्व संशयित आरोपींना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news