दिल्लीतील तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा | पुढारी

दिल्लीतील तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
कोरोना वेगाने फैलावत असलेल्या प्रमुख शहरात देशाची राजधानी दिल्लीचा समावेश आहे. दिल्लीतील पोलीस दलालाही कोरोनाने गाठले असून आतापर्यंत तीनशे कर्मचाऱ्यांना या विषाणूची बाधा झाली आहे. कोरोना झालेल्यांत अतिरिक्त पोलीस आयुक्ताचा (गुन्हे शाखा) समावेश आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे, ते विलगीकरणात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

दिल्ली पोलीस दलातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 80 हजार इतकी आहे. कोरोनाचा खात्यातील प्रसार टाळण्यासाठी आयुक्त राकेश अस्थाना यांनी अलीकडेच मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. पोलिसांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर्समध्ये होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा पोलीस खात्यासाठी वेगळी मार्गदर्शक तत्वे आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे निर्देशही जारी करण्यात आलेले आहेत.

Back to top button