Sara-Shubman : सारा तेंडुलकर-शुबमन गिलचा Beach फोटो व्हायरल!

Sara-Shubman : सारा तेंडुलकर-शुबमन गिलचा Beach फोटो व्हायरल!
Sara-Shubman : सारा तेंडुलकर-शुबमन गिलचा Beach फोटो व्हायरल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : सचिन तेंडुलकरची मुलगी (sachin tendulkar daughter) सारा तेंडुलकर (sara tendulkar) आणि शाहरुख खानची फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चा सलामीवीर शुबमन गिल (shubman gill) यांच्याबद्दल सतत चर्चा होत असते. दोघांमधील नात्याच्या बातम्याही अनेकदा अफवांच्या रूपाने व्हायरल होतात. मात्र त्यांच्याबाबत कधीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. (Sara-Shubman)

दरम्यान, दोन्ही स्टार्सनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रत्येकी एक फोटो शेअर केला आहे. योगायोगाने या फोटोत शुबमन गिल (shubman gill) आणि सारा तेंडुलकर (sara tendulkar) दोघेही बीचवर दिसत आहेत. साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कारमध्ये बसलेली आहे आणि साइड मिररमधून तिचा चेहरा दिसत आहे. त्याचवेळी गिलही बीचवर एका झोपाळ्यात बसलेला दिसत आहे. (Sara-Shubman)

याशिवाय भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर शुबमन गिलने (shubman gill) आणखी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याचे फोटो दिसत होते. या फोटोंमध्येही तो बीचला लागून आसलेल्या रेथी फारू रिसॉर्टमध्ये दिसत आहे. एका फोटोत तो खूप आनंदी दिसत आहे. त्याने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, 'माझा NY मूड.' (Sara-Shubman)

काही दिवसांपूर्वी शुबमन गिल (shubman gill) आणि वरुण धवन यांची भाची अंजनी धवनचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये दोघांच्या डिनर डेटची बातमीही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. याशिवाय सारा तेंडुलकरही (sara tendulkar) काही दिवसांपूर्वी लंडनहून मुंबईत परतली होती, ती विमानतळावर स्पॉट झाली होती आणि एका व्हिडिओमध्ये ती डान्स करतानाही दिसली होती. (Sara-Shubman)

सचिन तेंडुलकरच्या मुलीने नुकतेच मॉडेलिंगच्या जगातही प्रवेश केला आहे. तिच्या एका जाहिरातीचा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ती अभिनेत्री बनिता संधू आणि तानिया श्रॉफसोबत दिसत होती. याशिवाय तिचे अनेक फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर मोजक्याच क्रिकेटपटूंनाच फॉलो करते, त्यापैकी एक म्हणजे शुभमन गिल. शुबमन गिलची बहीण शहनील गिलचेही तिच्या इन्स्टा फॉलोअर्स लिस्टमध्ये नाव आहे. शुबमन आणि सारा यांच्यात काहीतरी चालले आहे, अशा अनेकदा बातम्या समोर आल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news