काेराेना : ‘होम आयसोलेशन’साठी केंद्र सरकारकडून नव्‍या गाईडलाईन्‍स जारी | पुढारी

काेराेना : 'होम आयसोलेशन'साठी केंद्र सरकारकडून नव्‍या गाईडलाईन्‍स जारी

नवी दिल्‍ली: पुढारी वृत्तसेवा
देशभरात कोरोनाचे रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. त्‍यामुळे तिसरी लाट येण्‍याची शक्‍यताही व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, ‘होम आयसोलेशन’साठी (गृह विलगीकरण ) केंद्र सरकारकडून नव्‍या गाईडलाईन्‍स ( मार्गदर्शक तत्त्‍व ) जारी केल्‍या आहेत. रुग्‍णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍यानंतर सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप नसेल तरच रुग्‍णाचा होम आयसोलेशनचा ( गृह विलगीकरण ) कालावधी संपले. तसेच त्‍याने पुन्‍हा कोरोना चाचणी करण्‍याची आवश्‍यकता  नाही.

Kolhapur Omicron : कोल्हापुरात ओमायक्राॅनचे आणखी नवे ४ रुग्ण

कोरोना संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीने होम आयसोलेशनमध्‍ये रहावे. आपल्‍या वस्‍तू कोणालाही देवू नयेत. रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आणि शरीराचे तापमान यांची वारंवार तपासणी करावी. यामध्‍ये कमतरता असल्‍यास तत्‍काळ याची माहिती डॉक्‍टरांना द्‍यावी. होम आयसोलेशनमधील रुग्‍णांनी तीन लेअरचा मास्‍क वापरावा. तसेव हा मास्‍क ७२ तासांनी एका कागदामध्‍ये गुंडाळून त्‍याची योग्‍य विल्‍हेवाट लावावी. तसेच वारंवार हात धुणे आणि पुरेसे पाणी प्‍यावे, असेही स्‍पष्‍ट केले आहे.

नव्‍या गाईडलाईन्‍स…

१) सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण घरीच राहतील.
2) ज्‍या रुग्‍णांची ऑक्‍सिजन पातळी ९३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल त्‍यांना होम आयसोलेशनमध्‍ये ठेवण्‍याची परवानगी देण्‍यात येईल.
३ रुग्‍णांनी ट्रिपल लेयर मास्‍कचा वापर करावा
४ एचआयव्‍हीबाधित किंवा अवयव प्रत्‍यारोपण आणि कर्करोग झालेले रुग्‍ण डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार होम आयसोलेशनमध्‍ये रहावे.
3) डॉक्‍टरांच्‍या सल्‍लानेच औषधै सेवन करावे

जिल्‍हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरु करावा

केंद्र सरकारकडून नव्‍या गाईडलाईन्‍समध्‍ये म्‍हटले आहे की, कोरोनाबाधित रुग्‍णांनी वैद्‍यकीय अधिकार्‍यांच्‍या संपर्कात रहावे. तसेच कोरोनाबाबत अफवा पसरवणार्‍या माहितीबाबत सावध रहावे. जिल्‍हा आणि उपजिल्‍हा नियंत्रण कक्ष सुरु करावे. या नियंत्रण कक्षाचे टेलिफोन नंबर सार्वजनिक करावेत. तसेच होम आयसोलेशनमध्‍ये असणार्‍या रुग्‍णांच्‍या संपर्कात रहावे, नियंत्रण कक्षातून त्‍यांना फोन करण्‍यात यावा.

हेही वाचलं का? 

 

 

 

Back to top button