पुढारी ऑनलाईन डेस्क
जानेवारी-मार्च तिमाहीमध्येही IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उत्तम सुवर्णसंधी ठरू शकते. मार्च तिमाहीत अनेक कंपन्या त्यांचे IPO घेऊन येत आहेत. मर्चंट बँकर्सनी सांगितले की आयपीओची क्रेझ अजून संपलेली नाही आणि या तिमाहीत सुमारे दोन डझन कंपन्या त्यांचे आयपीओ आणणार आहेत. यातील बहुतांश तंत्रज्ञान कंपन्या आहेत. या IPO अंतर्गत कंपन्यांना एकूण ४४ हजार कोटी रुपये उभे करायचे आहेत. २०२१ मध्ये ६३ कंपन्यांनी IPO च्या माध्यमातून विक्रमी १.२ लाख कोटी रुपये उभे केले आहेत.
मार्च तिमाहीत IPO लॉन्च करणाऱ्या कंपन्यांपैकी हॉटेल एग्रीगेटर OYO (रु. ८ हजार ४३० कोटी) आणि पुरवठा साखळी कंपनी Delhivery (रु. ७ हजार ४३०कोटी) यांचा समावेश असल्याचे मर्चंट बँकर्सनी सांगितले.
याशिवाय, त्यांनी अदानी विल्मर (रु. ४ हजार ५०० कोटी), एमक्योर फार्मास्युटिकल्स (रु. ४ हजार कोटी), वेदांत फॅशन (रु. २ हजार ५०० कोटी), पारादीप फॉस्फेट्स (रु. २ हजार २०० कोटी), मेदांता (२ हजार कोटी) आणि इक्सिगो (रु. १ हजार ८०० कोटी) सारख्या कंपन्या देखील IPO आणणार आहेत.
मर्चंट बँकर्स पुढे म्हणाले की, स्कॅनरे टेक्नॉलॉजीज, हेल्थियम मेडटेक आणि सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजी देखील या कालावधीत त्यांचे आयपीओ आणू शकतात. या कंपन्या ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक ग्रोथ इनिशिएटिव, कर्जाची परतफेड आणि विद्यमान भागधारकांना बाहेर पडण्यासाठी निधी उभारत आहेत.
रिकुर क्लबचे संस्थापक एकलव्य म्हणाले की, भांडवल उभारण्यासाठी कंपन्यांद्वारे आयपीओ लोकांद्वारे आणले जातात, ज्यामुळे स्टॉकची तरलता वाढते आणि त्याच वेळी मूल्यांकन देखील दिसून येते." LearnApp.com चे संस्थापक आणि सीईओ प्रतीक सिंह म्हणाले की, टेक कंपन्यांना आता जागतिक स्तरावर वाढ करायची आहे आणि त्यासाठी त्यांना भांडवल लागेल. हे भांडवल आयपीओद्वारे उभारले जात आहे.
हे ही वाचलं का ?