

मुंबई : पुढारी ऑनलाईन
अल्पसंख्याक समाजातील महिलांची सोशल मीडियावर बदनामी करुन त्यांच्या लिलावाची माहिती अपलोड केल्याप्रकरणी अभियांत्रिकी विद्यार्थी विशाल कुमारला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विशालला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बुल्ली बाई या नावाने वादग्रस्त अॅपद्वारे मुस्लिम समाजातील महिलांना अज्ञात व्यक्तीकडून टार्गेट केले जात होते.
दिल्लीनंतर मुंबईत शहरात वास्तव्यास असलेल्या दोन महिलांना अशाच प्रकारे टार्गेट करण्यात आले होते. याप्रकरणी दिल्लीनंतर मुंबई सायबर सेल पोलीस ठाण्यात संबंधित महिलांनी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.
हे ही वाचलं का?