नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galvan Valley) आपला झेंडा फडकविला होता. त्यावरून सोशल मीडियावर मोदी सरकारवर विविध स्तरांमधून मोठ्या प्रमाणात टीका झालेली होता. मात्र, भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार नव्या वर्षानिमित्ताने गलवान खोऱ्याच्या सीमेवर भारतीय लष्कराने तिरंगा फडकविला आहे, असंही लष्कराच्या सूत्रांनुसार सांगण्यात येत आहे.
गलवानच्या खोऱ्यात चीनने झेंडा फेडकविला, असे वृत्त ज्यावेळी आले होते. त्यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावेदेखील चीनकडून बदलण्यात येत आहेत, असेही वृत्त आलेले होते. मात्र, चीनने वादग्रस्त लॅण्ड बाऊंड्री लाॅ लागू करण्याअगोदर हे पाऊल उचलले होते. यासर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने म्हंटलं आहे की, "आम्हाला माध्यमांमधून अशी माहिती मिळाली होती की, चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही भागांची नावे बदलण्यात येत आहे. पण, फक्त नावे बदलली म्हणून वास्तव बदलता येत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही राहील", असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Galvan Valley)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले की, "चीनने २०१७ मध्येही अशी कुरघोडी केली होती. त्यानंतर २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केलेली होती. त्यात चीनी आणि भारतीय सैन्य एकमेकांसमोर उभी राहिली होती, त्यात २० भारतीय जवान शहीददेखील झाले होते. पण, यात चीनच्या ४० पेक्षा जास्त जवानांचा मृत्यू झाला होता." गलवान खोऱ्यात तिरंगा फडकवून भारताने चीनला जशास जसे उत्तर दिले आहे, असं मानलं जात आहे.
पहा व्हिडीओ : जिल्ह्यातून हातभट्टीचे समूळ उच्चाटन : नव्या वर्षात एस. पी तेजस्वी सातपुतेंनी दाखवली नवी उमेद