Kerala crime : आईची अब्रू वाचविण्यासाठी अल्पवयीन मुलींकडून वृद्ध काकाची हत्या | पुढारी

Kerala crime : आईची अब्रू वाचविण्यासाठी अल्पवयीन मुलींकडून वृद्ध काकाची हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : आईची अब्रू लुटण्यासाठी आलेल्या वृद्धाची दोन अल्पवयीन लेकींनी हत्या केल्याची घटना केरळमध्ये घडली आहे. त्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असं सांगितलं जात आहे की, आईचं लैंगिक शोषण करण्यासाठी आलेला वृद्ध हा संबंधित मुलींच्या मावशीचा पती होता. त्याची हत्या केल्यानंतर मुलींनी व आईने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. (Kerala crime)

संबंधित घटना ही केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील आहे. सविस्तर वृत्त असे की, दोन मुलींसह आई मृत वृद्धाच्या घराशेजारी राहत होती. हा वृद्ध मुलींचा काका होता. त्याचं नाव मोहम्मद कोया असं होतं. मोहम्मद कोयाने संबंधित मुलींच्या आईची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही मुलींना काकाला रोखण्याचा प्रयत्न केला.

परंतु, हा प्रयत्न तोडका पडू लागला, त्यामुळे दोन्ही मुलींना कुऱ्हाडीच्या मदतीने काकाची हत्या केली. त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीजवळ टाकून दिला. नंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. घराशेजारचा काका हा संबंधित मुलीच्या आईला सातत्याने त्रास देत होता. बराच काळ हा त्रास सहन केल्यामुळे शेवटी या अल्पवयीन मुलींना काकाची हत्या केली. (Kerala crime)

मुलींना पोलिसांना दिलेल्या जबाबात असं सांगितलं आहे की, “सकाळी ११ वाजता घरात घुसून वयोवृद्ध काका आईचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करू लागला. या शोषणापासून बचाव करणासाठी मुलींनी आणि आईने खूप प्रयत्न केला. शेवटी मुलींनीच त्या काकावर गळ्यावर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली.

पाहा व्‍हिडीओ : कोरोना रुग्णांसाठीचा ‘प्राण’ – ऑक्सिजन कसा बनतो?

Back to top button