team india schedule 2022 : टीम इंडियाचा नव्या वर्षात भरगच्च कार्यक्रम

team india schedule 2022 : टीम इंडियाचा नव्या वर्षात भरगच्च कार्यक्रम
Published on
Updated on

नवी दिल्ली : 2022 मध्ये कसोटी व मर्यादित षटकांच्या संघासाठी वेगवेगळे कर्णधार असतील. तसेच या वर्षात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप स्पर्धाही होणार आहे. याशिवाय दोन नव्या संघासह एकूण 10 संघांमध्ये 'आयपीएल-2022' रंगणार आहे. (team india schedule 2022) भरगच्च कार्यक्रमामुळे यावर्षी भारतीय संघ अत्यंत व्यस्त राहणार आहे.

द. आफ्रिकेविरुद्धचा उर्वरित कार्यक्रम

3 ते 7 जानेवारी : दुसरी कसोटी : जोहान्सबर्ग
11 ते 15 जानेवारी : तिसरी कसोटी : केपटाऊन
19 जानेवारी : पहिली वन-डे : पर्ल
21 जानेवारी : दुसरी वन-डे : पर्ल
23 जानेवारी : तिसरी वन-डे : केपटाऊन

वेस्ट इंडिज करणार भारताचा दौरा

दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरून परतल्यानंतर भारतीय संघ मायदेशी वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 व वन-डे मालिका खेळणार आहे.

6 फेब्रुवारी : पहिला वन-डे : अहमदाबाद
9 फेब्रुवारी : दुसरी वन-डे : जयपूर
12 फेब्रुवारी : तिसरी वन-डे : कोलकाता
15 फेब्रुवारी : पहिला टी-20 : कटक
18 फेब्रुवारी : दुसरी टी-20 : विशाखापट्टणम
20 फेब्रुवारी : तिसरी टी-20 : तिरूवनंतपूरम

श्रीलंका येणार भारत दौर्‍यावर (team india schedule 2022)

वेस्ट इंडिजविरुद्धची वन-डे आणि टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ मायदेशामध्येच श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

25 फेब्रु. ते 1 मार्च : पहिली कसोटी : बंगळूर
5 ते 9 मार्च : दुसरी कसोटी : मोहाली
13 मार्च : पहिली टी-20 : मोहाली
15 मार्च : दुसरी टी-20 : धर्मशाला
18 मार्च : तिसरी टी-20 : लखनौ

द. आफ्रिका येणार भारत दौर्‍यावर

'आयपीएल-2022'नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. दोघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळविली जाईल.

9 जून : पहिली टी-20 : चेन्नई
12 जून : दुसरी टी-20 : बंगळूर
14 जून : तिसरी टी-20 : नागपूर
17 जून : चौथी टी-20 : राजकोट
19 जून : पाचवी टी-20 : दिल्ली

भारत जाणार इंग्लंडच्या दौर्‍यावर

मायदेशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पार पडल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात दोन्ही संघादरम्यान गतसाली बाकी राहिलेली पाचवी कसोटी खेळविली जाईल आणि त्यानंतर तीन वन-डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका होईल.

1 ते 5 जुलै : पाचवी टेस्ट : बर्मिंगहॅम
7 जुलै : पहिली टी-20 : साऊथॅम्प्टन
9 जुलै : दुसरी टी-20 : बर्मिंगहॅम
10 जुलै : तिसरी टी-20 : नॉटिंगहॅम
12 जुले : पहिली वन-डे : लंडन
14 जुलै : दुसरी वन-डे : लंडन
17 जुलै : तिसरी वन-डे : मँचेस्टर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news