पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील तारखेच्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी पंचांवर दबाव टाकत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यांवर आज केले आहेत. नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप जाहीर करुन त्यांनी हे आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर आरोप केले. मलिक यांनी पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. यात एक एनसीबीचे अधिकारी एका पंचावर मागील तारखेच्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत असल्याचं क्लिपमध्ये आहे. हा एनसीबीचा अधिकारी बाबू नावाचा आहे, असंही नवाब मलिक यांनी म्हंटलं आहे.
या ऑडिओ क्लिप प्रकरणात समीर वानखेडे यांचा हात असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पंच आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांमधील हे संभाषण असल्याचं नवाब मलिक यांनी म्हंटलं आहे. एसआयटीने आतापर्यंत काय तपास केला, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधीकाऱ्यावर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचलत का?