Team India वर दंडात्मक कारवाई, ICC चा मोठा दणका! | पुढारी

Team India वर दंडात्मक कारवाई, ICC चा मोठा दणका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी करत सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विक्रमी विजय नोंदवला. क्रिकेटप्रेमी हा ऐतिहासिक विजय साजरा करत असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाला संथ गोलंदाजी केल्याने चांगलीच शिक्षा मिळाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटी (SA vs IND) सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे भारतीय संघाला (Team India) दंड ठोठावण्यात आला आहे. टीम इंडियाला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून एक गुण वजा केला जाईल. याआधी इंग्लंड दौ-यामध्ये टीम इंडियाला गुण कमी होण्याचा फटका बसला आहे.

सेंच्युरियन कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एक गुण गमवावा लागल्याने भारतीय संघाला (Team India) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आयसीसीने काल याबाबत माहिती दिली. भारतीय संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार गोलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी २० टक्के दंड आकारण्यात आला. अमिराती आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी अँड्र्यू पायक्रॉफ्ट यांनी याबाबत निर्णय घेतला. भारत लक्ष्यापेक्षा एक षटक टाकण्यात कमी पडल्याने दंड ठोठावण्यात आल्याचे पायक्रॉफ्ट यांनी सांगितले. नियमानुसार, प्रत्येक

भारतीय कर्णधार विराट कोहलीला या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आणि त्याने प्रस्तावित शिक्षा मान्य केली, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाही. पंच मारायस इरास्मस, एड्रियन होल्डस्टॉक, अल्लाउद्दीन पालेकर आणि बोंगानी झेले यांनी आरोप केले होते. अशी माहिती समोर आली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ (Team India) चौथ्या स्थानावर आहे. स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडच्या संघाला अनेक गुण गमवावे लागले आहेत. इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांच्या खाली फक्त दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आहेत.

सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारतीय संघ ओव्हर रेटच्या बाबतीत पिछडीवर होता पण टीम इंडियाने 113 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. भारतीय संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला प्रत्येक क्षेत्रात मागे टाकले. केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले. केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मयंक अग्रवालनेही अर्धशतक केले.

Back to top button