पक्षांतर रोखण्यासाठी ‘आप’ने उचलले अनोखे पाऊल, उमेदवारांकडून करून घेणार ‘हे’ काम | पुढारी

पक्षांतर रोखण्यासाठी 'आप'ने उचलले अनोखे पाऊल, उमेदवारांकडून करून घेणार 'हे' काम

पुढारी ऑनलाईन: गोवा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) यावेळी पक्षांतर रोखण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. ‘आप’कडून सांगण्यात आले आहे की, निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाहीत या कायदेशीर शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल.

निवडणूक रोख्यांची विक्री १ जानेवारीपासून सुरु होणार, सरकारने दिली मान्यता

गोव्यातील नेते इतर पक्षांमध्ये सामील होण्यासाठी ‘कुप्रसिद्ध’: AAP

‘आप’च्या एका नेत्याने सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मतदानोत्तर पक्षांतर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कारण पक्षाला वाटते की इतर पक्षांमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांसाठी गोवा “कुप्रसिद्ध” आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत सर्व 40 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे.

उमेदवाराला करावी लागणार कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी

आप नेते अमित पालेकर म्हणाले, “छोटे राज्य असूनही, गोवा राजकीय पक्षांतरासाठी बदनाम आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, ‘आप’ उमेदवार कायदेशीर शपथपत्रावर स्वाक्षरी करतील, ज्यामध्ये त्यांना इतर कोणत्याही पक्षात सामील न होण्याचे वचन द्यावे लागेल. काँग्रेस आपले उमेदवार पक्ष बदलणार नाहीत याची काही हमी देऊ शकते का, असा सवाल त्यांनी केला.

कोल्हापुरातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत

2019 मध्ये काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये दाखल

पालेकर म्हणाले, “राज्यात असा एकही पक्ष नाही जो आपले उमेदवार भाजपमध्ये जाणार नाही याची खात्री देऊ शकेल. 2019 मध्ये काँग्रेसचे किमान 10 आमदार भाजपमध्ये दाखल झाले होते. उमेदवाराने स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र मतदारांमध्ये वाटले जाईल, असे ते म्हणाले. उमेदवाराने नकार दिल्यास मतदार त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात, असे आप नेते म्हणाले.

Back to top button