Delhi Metro : मेट्रोत पन्नास टक्क्यांच्या सीट मर्यादेमुळे दिल्लीत प्रवाशांचे हाल | पुढारी

Delhi Metro : मेट्रोत पन्नास टक्क्यांच्या सीट मर्यादेमुळे दिल्लीत प्रवाशांचे हाल

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
बसेस तसेच मेट्रोमध्ये  ( Delhi Metro ) एकूण सीट क्षमतेच्या तुलनेत 50 टक्के प्रवाशी वाहून नेण्याची अट अंमलात आल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करणाऱ्या लोकांची आबाळ सुरु झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे दिल्ली प्रशासनाने नुकतीच पन्नास टक्क्यांची मर्यादा लागू केली आहे.

दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात डीडीएमएने मेट्रो रेल्वेमध्ये एकूण जागांच्या तुलनेत 50 टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याची अट घातलेली आहे. मेट्रोमध्ये उभे राहून प्रवास करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. कमी प्रवासी घेऊन मेट्रो गाड्या धावत असल्याने असंख्य प्रवाशांना पुढील गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. विशेषतः लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी लक्ष्मी नगर, अक्षरधामसहित अनेक मेट्रो स्थानकांवर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. जी स्थिती मेट्रोची आहे, तीच स्थिती डीटीसीच्या सार्वजनिक आणि क्लस्टर बसेसची आहे.

हेही वाचलं का? 

 

 

 

Back to top button