भाजपने चुकून आपल्याच अत्तर व्यापाऱ्यावर छापा टाकला; अखिलेश यादव म्हणाले... | पुढारी

भाजपने चुकून आपल्याच अत्तर व्यापाऱ्यावर छापा टाकला; अखिलेश यादव म्हणाले...

उन्नाव, पुढारी ऑनलाईन : कानपूर येथील अत्तर व्यापाऱ्यावर छापा टाकल्यानंतर करोडो रुपयांची संपत्ती सापडल्यानंतर आता तो नेमका कुठल्या पक्षाचा यावरून वाद सुरू झाले आहेत. जैन हा समाजवादी पक्षाचा निकटचा असल्याचे सांगितले जात होते, आता समाजावादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पलटवार केला आहे, ‘भाजपची डिजीटल गडबड झाली आणि त्यांनी आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकला आहे.’
अत्तर व्यापारी पीयूष जैन याचा आपल्या पक्षाशी काही संबंध नाही, असे यादव यांनी म्हटले आहे.

तसेच, भाजपची खिल्ली उडवत, त्यांनी चुकून आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकल्याचे म्हटले. जैनच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड)मधून त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक भाजप नेत्यांची नावेही बाहेर येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘भाजपने चुकून आपल्याच व्यापाऱ्या छापा टाकला आहे. समाजवादी अत्तर (परफ्यूम) पीयूष जैन नव्हे तर एमएलसी पुष्पराज जैन यांनी तयार केले होते. सत्ताधारी भाजपने डिजिटल चुकीने आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकला.” यावेळी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने, नोटाबंदी आणि जीएसटी अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर विभाग, जीएसटी आणि सीमाशुल्क विभागाने कानपूरमध्ये परफ्यूम व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला. त्यात २५७ कोटी रुपये रोख, २५ किलो सोने आणि २५० किलो चांदी जप्त करण्यात आली. हा अत्तर व्यापारी आता पोलिस कोठडीत आहे. याचा समाजवादी पक्षाशी संबंध होता, त्याने समाजवादी अत्तर तयार केले असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता.

हरदोईच्या सभेत मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही अखिलेश यांच्यावर टीका करताना ‘ व्यापाऱ्यावर छापा टाकल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागले आहे, असा आरोप केला. समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडे टाकलेल्या छाप्यात अडीचशे कोटी रुपये सापडले , यामुळे त्यांना काय बोलावे सुचेना.’ असा टोला लगावाला.

हेही वाचा : 

Back to top button