कोल्हापूर : पन्हाळा नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातात

कोल्हापूर : पन्हाळा नगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हातात
Published on
Updated on

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेवर 31 डिसेंबर पासून राज्य शासनाने प्रशासक नियुक्ती केली असून, प्रशासकपदी मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र आज पन्हाळा पालिकेला प्राप्त झाले.

कोरोनामुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून पालिकेचा कार्यभार मुख्याधिकारी स्वरूप खरगे हे पहाणार आहेत,

पन्हाळा नगरपालिकेत गेली पाच वर्षे जनसुराज्य शक्ती पक्षाची निर्विवाद सत्ता होती. पालिका निवडणूकीसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हि निवडणूक पुढे ढकलल्याने इच्छुकांच्यात नाराजी पसरली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news