ओमायक्रॉनचा धोका : राजधानीत 'जीआरएपी' लागू! नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता | पुढारी

ओमायक्रॉनचा धोका : राजधानीत 'जीआरएपी' लागू! नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात विशेषत: दिल्लीत ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता आम आदमी पार्टी सरकारने राज्यात ग्रेडेड रिस्पॉन्स एक्शन प्लॅन (जीआरएपी) लागू केला आहे. राजधानीत आता येलो अलर्ट जारी होण्याची शक्यता वर्तवली आहे.कोरोना महारोगराईच्या नवीन व्हेरियंटचा सामना करण्यासाठी अनेक प्रतिबंध याअंतर्गत लावण्यात आले आहेत. दिल्लीत आतापर्यंत १६५ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केजरीवाल सरकारने जुलै २०२१ मध्येच जीआरएपी प्लॅनची आखणी केली होती. याअंतर्गत राज्यात लॉकडाऊन कधी लावण्यात येणार, कधी काय बंद करण्यात येईल आणि कधी काय सुरू करण्यात येईल यासंबंधीचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या प्रतिबंधांमुळे शाळा, मेट्रो, बस सेवेसह व्यायामशाळा, बॅक्वेट हॉल प्रभावित होण्याची शक्यता आहे.

ओमायक्रॉनचा धोका : यलो अलर्ट मधील प्रतिबंध

१) नाईट कर्फ्यू रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत
२) ऑड-ईव्हन नियमानूसार सकाळी १० ते ८ वाजतापर्यंत दुकाने खुले राहतील.
३) शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था तसेच कोचिंग इंस्टीट्युट बंद राहतील.
४) ५०% क्षमतेने रेस्टोरेंट,मद्यालये सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत खुले राहतील.
५) सिनेमागृह, मल्टीप्लेक्स,बॅक्वेट हॉल, ऑडिटोरियम, स्पा, जीम, योगा इंस्टीट्युट ,एंटरटेनमेंट पार्क बंद राहतील.
६) ५०% आसन क्षमतेनूसार मेट्रो संचालित केली जाईल.
७) लग्न समारंभात केवळ २० लोकांना परवानगी
८) सामाजिक, राजकीय,धार्मिक, उत्सव, मनोरंजनासंबंधी आयोजनांवर बंदी.
९) धार्मिक स्थळ सुरू राहतील. पंरतु, भाविकांना प्रवेश राहणार नाही.

हेही वाचलं का? 

Back to top button