महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ : पदोन्नती देण्याचा शासन निर्णय | पुढारी

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ : पदोन्नती देण्याचा शासन निर्णय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक पदावर अधिकारी कार्यरत आहेत. खालील नमूद अधिकाऱ्यांना शासनाने मान्य केलेल्या निवड सूचीनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे. शिक्षण संचालक व समकक्ष, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ (प्रशासन शाखा) संरचनेत ज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात रिक्त असलेल्या पदांवर पदोन्नती देण्यात येईल. तात्पुरती पदोन्नती देण्याचा हा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार, नावे अशी- दिनकर टेमकर. संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे; शरद गोसावी .अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे; महेश पालकर .संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे; कृष्णकुमार पाटील. शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पुणे.

Back to top button