पुणे जिल्हा बँक : आमदार दिलीप मोहिते संचालकपदी बिनविरोध | पुढारी

पुणे जिल्हा बँक : आमदार दिलीप मोहिते संचालकपदी बिनविरोध

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( पुणे जिल्हा बँक ) संचालकपदी आमदार दिलीप मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटाच्या खेड तालुका मतदारसंघातून शरद बुट्टे-पाटील यांनी मंगळवारी (दि. २१) आणि हिरामण सातकर यांनी बुधवारी (दि २२) माघार घेतली. या निवडणुकीसाठी, खेड तालुका विकास सोसायटी गटातून म्हणजेच ‘अ’ गटातून आमदार मोहिते, सातकर आणि बुट्टे पाटील यांनी उमेदवारीअर्ज दाखल केले होते. बुट्टे आणि सातकर यांच्या माघारी झाल्याने मोहिते बँकेवर बिनविरोध निवडले गेले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटातून बिनविरोध निवड होण्याची ही खेड तालुक्यातील पहिली वेळ असल्याचे मानले जात आहे.

जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष असलेले हिरामण सातकर यांनी पुणे येथील जिल्हा बँकेच्या ( पुणे जिल्हा बँक ) दालनात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आमदार मोहितेंसमवेत उपस्थित राहून अर्ज मागे घेतला. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कैलास सांडभोर, अरुण चौधरी, विनायक घुमटकर, राजाराम लोखंडे, किरण मांजरे, मयूर मोहिते, सुभाष होले, लक्ष्मण वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Back to top button