

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशातर्गंत मोबाईल फोन निर्यातीत वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२१ मध्ये १.७ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत निर्यात वाढली. २०१७-१८ मध्ये मोबाईल फोन निर्यात केवळ ०.२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंतच होती. निर्यातीच्या तुलनेत आयातीत घट झाल्याचे दिसून आले. २०२१ मध्ये मोबाईल फोनची आयात ०.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत कमी झाली. २०१७-१८ मध्ये हे प्रमाण ३.५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत होते,अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री एस.अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची देशांतर्गत निर्यात, उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय), आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना (पीएलआय), इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे घटक आणि अर्धवाहकाच्या (सेमीकंडक्टर) उत्पादनाला प्रोत्साहन देणारी योजना सुरु केली आहे.
भारताला इलेक्ट्रॉनिक्स, प्रणाली संरचना ( सिस्टीम डिजाइन) आणि निर्मिती क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून स्थान भक्कम करण्यास या योजनांमुळे मदत होईल, असा विश्वास करीत कायद्यांन्वे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी स्वयंचलित मार्गाने १००% पर्यंत थेट परदेशी गुंतवणुकीस (एफडीआयला) परवानगी असल्याचे देखील पटेल म्हणाल्या.
हेही वाचलं का?