जेवणे आणि धावणेही झाले महाग; सीएनजी, पीएनजी दरात वाढ

जेवणे आणि धावणेही झाले महाग; सीएनजी, पीएनजी दरात वाढ
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता हैराण असताना आता सीएनजी आणि पीएनजी दरात केंद्र सरकारने वाढ केली आहे. महाराष्ट्रात सीएनजीच्या दरात २ तर पीएनजीच्या दरात दीड रुपयांनी वाढ केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे जेवणे आणि धावणे दोन्ही महाग झाले आहे.

वाढलेल्या कि'मतीमुळे सीएनजी ६३. ५० पैसे किलो तर पीएनजी ३८ रुपये प्रतियुनिट झाले आहे. मुंबईसह देशातील लखनौ, उन्नाव आणि आग्रा येथेही सीएनजी आणि पीनजीच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमागे गॅसच्या खरेदी दरातील वाढीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीनंतर शनिवार लखनौ, उन्नाव आणि आग्र्यात CNG ची किंमत ७२.५० रुपये प्रतिकिलो तर आयोध्येत ७२. ९५ रुपये प्रतिकिलो झाली. आत्तायर्पंत सीएनजीचा दर ७०. ५० रुपये होता. लखनौ आणि आग्रा शहरात पीएजनीची किंमत एक रुपये प्रति क्युबि मीटरने वाढून ३८. ५० रुपये झाली आहे.

सीएनजी पीएनजी दरात वाढ : दिल्लीत ४ डिसेंबरला झाली होती वाढ

याआधी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ४ डिसेंबर रोजी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थामध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामुळे दिल्लीत सीएनजीची किंमत ५३. ०४ रुपये प्रतिकिलो झाली होती. सरकारच्यावतीने २०२१ मध्ये नैसर्गिक गॅसच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात चौथ्यांदा वाढ केली आहे. सरकारने ऑक्टोंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान नैसर्गिक गॅसच्या किंमतीत २.९० डॉलरची वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडद्वारे गॅसच्या दरात वाढ केल्याने मुंबईत सीएनजीच्या किंमती मागील दोन महिन्यांत ११.५२ रुपये प्रतिकिलो म्हणजेच २२ टक्क्यांनी तर पीएनजीच्या किंमतीत ७. ६० रुपयांनी म्हणजे २५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news