bullet-proof vehicles : काश्‍मीरमध्‍ये पोलिसांना आता बुलेटप्रूफ वाहने | पुढारी

bullet-proof vehicles : काश्‍मीरमध्‍ये पोलिसांना आता बुलेटप्रूफ वाहने

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

काश्‍मीरमधील पोलिस कर्मचार्‍यांसाठी यापुढे  बुलेटप्रूफ वाहने (bullet-proof vehicles ) देण्यात येतील, अशी माहिती जम्‍मू-काश्‍मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी आज दिली. श्रीनगरमध्‍ये दहशतवाद्‍यांनी सोमवारी सायंकाळी पोलिसांच्‍या बसवर बेछूटपणे गोळीबार केला होता. या भ्‍याड हल्‍ल्‍यात चार पोलिस शहीद झाले; तर 10 जण गंभीर जखमी झाले होते.

जैश-ए-मोहम्‍मद या दहशतवादी संघटनेने हा हल्‍ला केला होता. हल्‍ला करुन दहशतवादी त्राल परिसरात पसार झाल्‍याचे सूत्रांनी सांगितले. श्रीनगरमध्ये भररस्त्यावर पोलिसांवर अशा प्रकारचा झालेला हा पहिलाच हल्ला होता.

bullet-proof vehicles : पोलिसांना दिले जाणार बुलेटप्रूफ वाहने

यापुढे जम्‍मू-काश्‍मीर पोलिसांना प्रवास करण्‍यासाठी बुलेटप्रूफ वाहने पुरवली जातील. हल्‍लेखोरांनी परिसरात रेकी केली होती. रोड ओपनिंग पार्टी हटविल्‍यानंतरच हल्‍ला केला होता, असेही विजय कुमार यांनी सांगितले. अत्‍यंत कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था असणार्‍या पसिरात हल्‍ला कसा झाला, असाही सवाल केला जात आहे. स्‍थानिक सुरक्षा व्‍यवस्‍थेत पोलिस महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्‍याच्‍याकडे दहशतवाद्‍यांच्‍या हालचालीची ९० टक्‍क्‍यांहून अधिक माहिती असते. त्‍यामुळेच राज्‍यातील पोलिस हे दहशतवाद्‍यांच्‍या टार्गेटवर असतात, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

 

 

Back to top button